रॉका शरद पवार गट जिल्हाध्यक्षपदी रेखा खेडेकर

    दिनांक :28-Jul-2023
Total Views |
बुलढाणा,
Rekha Khedekar राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार आणि अजित पवार दोन गट निर्माण झाल्याने बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा या राजकीय समीकरणाचा प्रभाव पडला असून शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी रेखाताई खेडेकर कार्याध्यक्ष नरेश शेळके प्रसन्नजीत पाटील, यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्राद्वारे मुंबई कार्यालयात केली आहे.
 
 
Rekha Khedeka
 
दुसरीकडे अजित पवार गटात माजी मंत्री आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हा सहकारी बँकेला मदतीच्या आश्वसानानंतर प्रवेश केल्याचे त्यांचे खंदे समर्थक जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी (सिंदखेडराजा) हे कायम आहेत. सध्या दोन्ही गटात सर्वाधिक फुट चिखली, बुलढाणा, जळगाव जामोद, मध्ये पडल्याचे दिसून येत आहे. Rekha Khedekar माजी आ. रेखाताई खेडेकर शरद पवार गटात जिल्हाध्यक्ष झाल्याने येत्या लोक सभा निवडणुकीत हा गट कायम राहिला तर त्या उमेदवारी लढवू शकतात त्यांना यापूर्वी भाजपा जिल्हाध्यक्ष पदाचा संघटनात्मक अनुभव आहे. बुलढाणा मुख्यालयी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अद्यावत मलकापूर रोडवर कार्यालय आहे. या कार्यालयावर शरद पवार गट व अजित पवार गट दोन्ही गटाचे पदाधिकारी दावा करीत असून नुकतीच पक्षाची संघटनात्मक बैठक नरेश शेळके यांचे पुढाकाराने पार पडली. भविष्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे कार्यालय नेमके कोणत्या गटाकडे राहिल हा संभ्रम अद्याप कायम आहे. अजीत पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड नाझेर काझी यांचेशी संपर्क साधला असता या कार्यालयाचे बांधकाम पासून सर्व रितसर परवानगी नगर पालिकेत नोंदणी व वार्षिक कराचा भरणा डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे पुढाकाराने आम्हीच केला आहे. राज्यातील जिल्हाध्यक्षांनी असलेल्या राष्ट्रवादी पक्ष कार्यालयावर नेमका कोणत्या गटाचा ताबा राहिल हे अद्याप निश्चित नाही परंतु शरद पवार गटाचे नरेश शेळके यांचे विनंती वरून त्यांच्या गटाची बैठक या कार्यालयात पार पडली. ताबा आणि मालकी हक्क कोणाचा ÷अद्याप स्पष्ट झाले नाही असे त्यांनी आर्वजून सांगितले आहे. नरेश शेळके यांनी सुद्धा या विषयी बोलतांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व घाटाखाली आणि घाटावर दोन कार्याध्यक्ष नियुक्त झाले आहे. जिल्हा कार्यालय कोणत्या गटाकडे राहीत हे ठरले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले मात्र पक्षात दोन गटात पडलेल्या उभ्या फुटेने अर्धे इकडे अर्धे तिकडे प्रमाणे एकाच जिल्हा कार्यालयात दोन गटाच्या बैठकी होतांना दिसतात तुर्तास एवढेच