अथर्व भट उदयोन्मुख बॉक्सर पुरस्काराने सन्मानित

29 Jul 2023 15:19:17
नागपूर, 
महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या मार्गदर्शनात जिल्हा अ‍ॅमॅच्युअर बॉक्सिंग असो. ऑफ नागपूरच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या राज्य बॉक्सिंग स्पर्धेत क्रीडापीठच्या (Atharva Bhat) अथर्व भटने उदयोन्मुख बॉक्सर हा पुरस्कार प्राप्त केला आहे. स्पर्धेत नागपूरच्या अथर्व भटने सबज्युनिअर मुलांच्या गटात ५८ ते ६१ किलो वजन गटात दमदार कामगिरीच्या जोरावर अंतिम फेरीत प्रवेश केला.
 
Atharva Bhat
 
अंतिम फेरीत (Atharva Bhat) अथर्वचा सामना जळगाव जिल्ह्याच्या ध्यानेश नाफडे सोबत झाला. यात जोरदार प्रहार करीत त्याने ध्यानेशला पराभूत करीत सुवर्णपदक प्राप्त केले. आरएसी नियमानुसार अथर्वला विजयी घोषित करण्यात आले. हीच विजयी कामगिरी पाहता सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख पुरस्कार देउन त्याला सन्मानित करण्यात आले. नागपूरचा रहिवासी असलेला अथर्व अकोला क्रीडापीठाचा विद्यार्थी असून मागील वर्षभरापासून तो क्रीडापीठमध्ये बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेतो. अथर्वने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिल आणि प्रशिक्षकांना दिले आहे.
Powered By Sangraha 9.0