सांडव्याच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये पोहायला जाऊ नये

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे आवाहन

    दिनांक :29-Jul-2023
Total Views |
वाशीम, 
Disaster Management Authority सततच्या पावसाने एकबुर्जी धरण हे ७१.६७ टक्के, पंचाळा प्रकल्प १०० टक्के तसेच जयपुर प्रकल्प हा ८०.१२ टक्के जलाशयाने भरलेला आहे. तालुयातील केकतउमरा, बोराळा, पंचाळा, वाई, सावळी, जयपुर, झोडगा, तोंडगाव, देवठाणा येथील नागरीकांनी पाण्याच्या प्रवाहामध्ये पोहण्याकरीता जाऊ नये, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.
 
 
Disaster Management Authority
 
उपरोक्त प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाण्याचा प्रवाह सुरु होउन सांडवा ओसंडुन वाहण्याची दाट शयता आहे. Disaster Management Authority तसेच नदीला पुर येण्याची शयता आहे.तरी या गावातील नागरीकांनी धरणाच्या खालील भागातील नदीकाठची गावे वाडया वस्त्यामध्ये राहणार्‍या नागरीकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करु नये. तसेच सांडव्याच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये पोहायला जाऊ नये.असे आवाहन तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा तहसीलदार वाशीम यांनी केले आहे.