माजी आमदार विजय जाधव यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

29 Jul 2023 16:57:38
वाशीम, 
Vijay Jadhav भाजपा नेते, शिपिंग कॉर्पोरेशनचे माजी संचालक तथा माजी आमदार विजयराव जाधव यांचा वाढदिवस मालेगाव शहर व तालुयात रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, रुग्णांना फळे वाटप आदीसह विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
 
 
Vijay Jadhav
 
माजी आमदार Vijay Jadhav जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील बालविकास शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करुन वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शाळेत मॅरेथॉन स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शनी, रंगभरण स्पर्धा, धांन्यापासून रांगोळी बनविण्याच्या स्पर्धेतील विद्यार्थ्यांना भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तानाजी पवार यांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल भिसडे होते तर प्रमुख उपस्थितीत तानाजी पवार, बाबुराव जाधव, विकास लांडकर, संतोष गुडदे, सुनिल मुंदडा, ईश्वर धोटे यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्याध्यापक भिसडे यांनी वृक्षरोपणाचे महत्व विषद केले. तसेच तानाजी पवार यांनी माजी आमदार जाधव यांच्या कार्यकर्तुत्वाची माहिती दिली. तालुयातील बोरगाव, आमखेडा, जामखेड, पिंपळा या गावातील जिप शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. शहरात आयोजित रक्तदान शिबिरात अनेक दात्यांनी रक्तदान करुन राष्ट्रीय कार्यात आपले योगदान दिले. तसेच ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माणिकराव घुगे, साहेबराव वाळूकर, जिजेबा घुगे, प्रभाकर आंधळे, सावंत, भोसले, खुळे, नवघरे, कांबळे, घुगे, कदम, शंकर वाळुकर, अंजली झांबरे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0