निसर्ग संवर्धन व संरक्षण ही काळाची गरज - डॉ. किशोर मानकर

30 Jul 2023 16:42:22
नागपूर,
मानवाने विकासाच्या नावाखाली (Nature conservation) निसर्गाच्या पर्यावरणाचा फार मोठ्या प्रमाणात ऱ्हास केला, त्याचाच दुष्परिणाम म्हणून मानवी जीवन धोक्यात आले आहे. निसर्गामध्ये वनस्पती, प्राणी, सुक्ष्मजीव, हवा, पाणी, माती इत्यादी घटकांचा समावेश होतो. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड केली, औद्योगिक व नागरिकरणामुळे हवा, जल, भूमी प्रदुषित झाले. दुर्मिळ वनस्पती, जीवसृष्टी नष्ट झाली. काही वनस्पती-प्राणी प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. प्रदुषणामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ झाली व पर्यावरणाचा समतोल ढळू लागला म्हणून पर्यावरण समतोल साधावयाचा असेल, तसेच मानवी जीवन सुरक्षित ठेवावयाचे असेल तर वृक्षरोपन करून पर्यावरण, निसगांचे संवर्धन व संरक्षण करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक वनीकरणाचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी केले.
 
Dr. Kishor Mankar
 
मुंडले इंग्लिश मिडीयम स्कुलमधील प्लॅटिनम जुबली सभागृहात (Nature conservation) निसर्ग संवर्धन दिन कार्यक्रम उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने मुंडले इंग्लिश मिडीयम स्कुल, नागपूर, बड्र्स ऑफ विदर्भ संस्था व नागपूर व महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
 
 
कार्यक्रमाला Nature conservation प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष मकरंद पांढरीपांडे, उपवनसंरक्षक डॉ भारतसिंह हाडा, हरविर सिंग, भावसे, संजय करकरे, महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प(विशेष कक्ष) संचालक डॉ. विनीता व्यास, मुंडले इंग्लिश मिडीयम स्कुलच्या मुख्याध्यापिका मेघा पाध्ये, डॉ. रुपाली हिगवे, शिल्पा डोंगरे, बड्र्स ऑफ विदर्भ संस्थेचे अविनाश लोंढे आदी उपस्थित होेते. मानवी जीवनात निसर्गाचे महत्व, विज्ञान व निसर्ग या विषयावर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार केले. डॉ. व्यास यांनी जैविक संसाधनाचे संवर्धन करण्यासाठी विद्याथ्र्यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात करावयाच्या छोट्या उपाययोजनेबाबत व महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्पाबाबत संक्षिप्त माहिती दिली.
Powered By Sangraha 9.0