डॉ. सतीश चिद्दरवार ‘सुश्रुत जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित

    दिनांक :31-Jul-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद, 
वैद्यकीय व लेआउट बांधकाम विश्वात तसेच सामाजिक आणि विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणारे (Dr. Satish Chiddarwar) डॉ. सतीश वसंत चीद्दरवार यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण केल्याने त्यांचा आर्य वैश्य समाज डॉक्टर असोसिएशन बांधवांच्या वतीने त्यांच्या एकसष्ठी निमित्त ‘सुश्रुत जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला.
 
Dr. Satish Chiddarwar
 
पुसद शहरातील वैद्यकीय क्षेत्र व ले-आउट बांधकाम क्षेत्रातील सुपरिचित Dr. Satish Chiddarwar डॉ. सतीश चीद्दरवार यांच्या एकसष्ठीनिमित्त आर्य वैश्य समाज डॉक्टर असोसिएशन बांधवांच्या वतीने 23 जुलै रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आर्य वैश्य समाज डॉक्टर असोसिएशनच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रात तसेच लेआउट बांधकाम क्षेत्रात व सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले शहरात मागील 35 वर्षापासून निरंकार सेवा देणारे सामाजिक कार्यात व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असलेले डॉ. सतीश चिद्दरवार यांच्या एकसष्ठी दिनानिमित्त आयोजित कार्यक‘माचे मुख्य अतिथी डॉ. देवानंद ओमनवार यांच्या हस्ते ‘सुश्रुत जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करून गौरविण्यात आले.
 
 
या कार्यक्रमाच्या वेळी डॉ. उमेश रेवणवार यांनी Dr. Satish Chiddarwar डॉ. सतीश चिद्दरवार यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या त्यामध्ये ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूल, मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, लेआउट व बांधकाम क्षेत्रात केलेले विकासकामे तसेच पंतप्रधान निवास योजनेतून नागपूर येथे 371 मध्यमवर्गीय नागरिकाचे घराचे स्वप्न करणारा प्रोजेक्ट व सर्वसामान्यांचे घराचे स्वप्नपूर्ती अशा समाज उपयोगी कामाचा संपूर्ण जीवनपट उलगडून गुणगौरव केला. यावेळी डॉ. सुधीर झिलपिलवार यांनी आर्य वैश्य समाजाच्या मंगल कार्याकरिता लेआउटची तीन एकर जमीन अदलाबदली करून सामाजिक भावनेतून समाजाच्या ट्रस्टला दिल्याबद्दल डॉ. सतीश चिद्दरवारांचे आभार मानले. याप्रसंगी त्यांचा मुलगा डॉ. सजल चिद्दरवार कार्डिओलॉजी हृदयरोग तज्ञ आणि रेडिओलॉजिस्ट एमडी (क्ष-किरण तज्ञ) झाल्याबद्दल डॉ. पूनम चिद्दरवारचा आर्य वैश्य समाज बांधवांतर्फे सत्कार करण्यात आला.
 
 
सत्कारमूर्ती Dr. Satish Chiddarwar डॉ. सतीश चिद्दरवार यांनी सत्काराला उत्तर देताना सर्व समाज बांधवांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली. सामाजिक कार्य भविष्यात अविरत ठेवण्याबाबत ग्वाही दिली. यावेळी डॉ. सुप्रिया सतीश चिद्दरवार यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक‘माचे सूत्रसंचालन डॉ. संतोष रेवणवार व डॉ. प्रणिता रेवणवार यांनी, तर आभारप्रदर्शन डॉ. आनंद कोमावार यांनी मानले. कार्यक‘माला डॉ. सुधीर झिलपिलवार, डॉ. उमेश रेवणवार, डॉ. आनंद कोमावार, डॉ. मिलिंद तगडपल्लेवार, डॉ. पद्मावार, डॉ. मंजुषा तगडपल्लेवार, डॉ. बिडवई, डॉ. प्रणिता रेवणवार व आर्य वैश्य समाजातील अनेक नामवंत डॉक्टर व समाजबांधवांची उपस्थिती होती.