जिल्ह्यात उद्या 1 ऑगस्टपासून महसूल सप्ताह

31 Jul 2023 20:21:28
तभा वृत्तसेवा
वर्धा,
महसूल विभागाच्या वतीने उद्या 1 ऑगस्टपासून Revenue week महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्त युवा संवाद, एक हात मदतीचा, महसूल अदालत, जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. सप्ताह कालावधीत महसूलच्या सेवा जास्तीत जास्त नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत.
 
Revenue week
 
1 रोजी सप्ताहाचा शुभारंभ होईल. या पहिल्या दिवशी महाराष्ट्र जमीन Revenue week महसूल अधिनियमाच्या कलम 55 चे तलाठीनिहाय ऑनलाईन प्रकरणे नोंदवून मुळ अभिलेखावरून पडताळणी करून प्रस्ताव मंजूर करण्याची कार्यवाही केली जाईल. ज्या गावांमध्ये दफनभूमी, स्मशानभूमी नाही अशा गावांचे प्रस्ताव तयार करून वरिष्ठ कार्यालयास सादर केले जातील. 2 रोजी युवा संवाद कार्यक्रमांतर्गत दहावी, बारावी नंतर प्रवेशासाठी लागणारे अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॅान क्रिमीलेअर, नवमतदार नोंदणीबाबत माहिती दिली जातील. सोबतच अनाथ मुलांना लाभ देण्याबाबत प्रकरणे दाखल केले जातील. 3 रोजी नैसर्गिक आपत्तीत बाधीतांना नुकसान भरपाई मिळाल्याची खात्री करण्यासोबतच पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल. पिकविम्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र व ते मिळविण्यासाठी कारवाई केली जाणार आहे. मंडळस्तरावर फेरफार अदालत व प्रत्येक तालुक्यात एका दुर्गम भागात महसूल अदालत घेतली जातील.
 
 
4 रोजी जनसंवाद उपक्रमांतर्गत सलोखा योजनेंतर्गत शेतातील रस्त्यांबाबत प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, जमीनविषयक तक्रार अर्ज निकाली काढणे, Revenue week आपले सरकार सेवा पोर्टलवरील तक्रारींवर कार्यवारी करून तक्रारी निकाली काढल्या जातील तसेच प्रत्येक तलाठी साजावर महसूल अदालत घेतली जाणार आहे. 5 रोजी सैनिक हो तुमच्यासाठी अंतर्गत सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना दाखले, प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही केली जातील. 6 रोजी महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्या विविध सेवाविषयक प्रलंबित बाबी निकाली काढण्यासाठी शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. 7 रोजी महसूल सप्ताहाचा समारोप होईल.
Powered By Sangraha 9.0