रस्त्याच्या तहसीलदारांकडून ‘तारीख पे तारीख’

31 Jul 2023 20:23:13
तभा वृत्तसेवा
 
वरूड, 
 
fast for road रस्त्याच्या मागणीसाठी वारंवार निवेदने देऊनही मागणी पूर्ण न करण्यात आल्याने अखेर शेतकरीपुत्रांनी आमरण उपोषणास सुरवात केली आहे. बेनोडा शहीद येथील शेतकरी शेतात ये-जा करण्याकरिता, शेतीमाल, संत्रा काढण्याकरिता, शेती विषयक इतर कामे करण्याकरिता रस्ता नसल्याने नदीपात्रातून ये-जा करून शेतीची सर्व कामे करीत होते. fast for road परंतु मागील वर्षीच्या महापुरामुळे नदीपात्रातून प्रवास करून शेती करणे शक्य नसल्याने बेनोडा शहीद येथील शेतकरी आदित्य पोटोडे, प्रदीप पोटोडे, ज्ञानेश्वर इंगोले, वसंत पोटोडे, विजय पोटोडे यांनी 18 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 नुसार अर्ज करून शेतात ये-जा करण्याकरिता रस्त्याची मागणी केली होती. fast for road 
 

uposhan 
 
त्या अर्जानुसार तलाठी व मंडळ अधिकारी यांनी स्थळ पाहणी करून तहसील कार्यालयाला अहवाल सादर केला होता. fast for road त्यानंतर तत्कालीन तहसीलदार मालठाणे यांनी पुन्हा स्थळ पाहणी केली व सर्व शेतकर्‍यांना तारीख देऊन तहसील कार्यालयात बोलावले होते. परंतु शेतकरी तहसील कार्यालयात अनेकदा गेले असता तहसीलदार उपस्थित नसायचे. अखेर शेतकर्‍यांना तारीख पे तारीख देऊन एक वर्षाचा कलावधी निघून गेला, पण तारीख देणे सुरूच असल्यामुळे अखेर अर्जदार शेतकर्‍यांच्या पुत्रांनी प्रशासनाच्या दिरंगाईला कंटाळून रस्त्याच्या मागणीकरिता सोमवार, 31 जुलैपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. fast for road यामध्ये मनोज इंगोले, अनंता कावरे, नीलेश पोटोडे, गौरव पोटोडे यांचा समावेश आहे. हे सर्व वरूडच्या तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहे.
Powered By Sangraha 9.0