अपघात रोखण्यासाठी वाहनचालक, प्रवाश्यांना उपाय योजना आवश्यक : जिपो अधिक्षक कडासने

04 Jul 2023 19:55:03
बुलढाणा, 
समृद्धी महामार्गवर झालेल्या दुर्दैवी अपघाताच्या पार्श्वभूमीवर अपघात रोखण्यासाठी वाहन चालकांची मेंदूची चेतना जागृती रहावी थकवा येवू नये यासाठी निर्धारित अंतरावर प्रवास केल्यानंतर चालक व प्रवाश्यांना रिफे्रशमेंट सेंटरची सोयी सुविधा, प्रवेशद्वारावर समुपदेशन केंद्र वाहनाची तपासणी करण्यासाठी उपाययोजना आवश्यक असून प्रवासातील मृत्यूचे भय दूर करण्याच्या दृष्टीने पोलिस मोबाईल पेट्रोलिंग करण्यात येईल या अपघाताची चौकशी करीता वाहनचालक शेख दानिश यास दोन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आल्याची माहिाती जिपो (Superintendent Kadashane) अधिक्षक सुनिल कडासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
Superintendent Kadashane
 
दि. 4 जुलै रोजी पोलिस मुख्यालयातील वसुंधरा हॉल येथे समृद्धी महामार्गावरील अपघात सदर्भाने पोलिस प्रशासनाकडून उपाययोजना या विषयी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक बि. बि. महामुनी, अशोक थोरात, प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गजरे उपस्थित होते.
 
 
जिपो अधिक्षक सुनिल कडासने (Superintendent Kadashane) यांनी सांगितले अपघात होण्यासाठी कारणीभूत असणार्‍यामध्ये वाहन चालकांचे बसवरील नियंत्रण सुटणे हे प्रमुख कारण असते रात्री 12 ते सकाळी सहा वाजेपर्यंत अपघात होण्याचे प्रमाण अधिक असते. मेहकर व सिंदखेडराजा, दुसरबिड रोडवर जास्त अपघाताच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. वाहनचालकाच्या मेंदूची चेतना जागृत रहावी त्यांना थकवा येवू नये, झोप, झोपेची डुलकी येवू नये प्रवाशाना सुद्धा जागृत राहाण्यासाठी निर्धारित अतंरावर रिफे्रेशमेंट सेंटर, हॉटेल सुविधा असल्यास प्रवासातील अडीअडचणी दूर होवू शकतील, शिवाय समृद्धी महामार्गाच्या प्रवेशद्वारावर समुपदेशन केंद्र वाहनाची नियमानुसार तपासणी झाली तरच प्रवासातील मृत्यूचे भय कमी होण्यास मदत होईल. त्यावर सर्व प्रशासकीय यंत्रणा सबंधित कंत्राटदार एजन्सी प्रादेशिक परिवहन विभाग सामूहिकरित्या प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समृद्धी महामार्ग अपघातातील अटकेत असलेला वाहन चालक शेख दानिश शेख इस्माईल यास दोन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली असून पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करीत आहे जखमी प्रवाशांकडून सुद्धा घटनेचा तपास करण्यात येणार असून खामगाव उपविभागीय अधिकारी यांची तपासा करीता नेमणूक करण्यात आली असल्याने अप्पर पोलिस अधिक्षक बिबि महामुनी यांनी सांगितले आहे.
 
 
प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गजरे यांनी सांगितले विदर्भ टॅ्रव्हल्सचा वाहनाचे अपघाताच्या घटना यापूर्वी समृद्धी महामार्गावर घडलेल्या आहेत. मोटार वाहन कायदा नुसार सकंटकालीन खिडकी, बसमध्ये अग्नीशमन यंत्र चालक व प्रवाशांना सिट बेल्ट महामार्गावरील लाईन नुसार वाहन चालवण्यिाची शिस्त आतापर्यंत 46 वाहनांच्या मालक चालकावर कारवाई झाली आहे. तसेच या (Superintendent Kadashane) महामार्गावर मेहकर, दुसरबिड, सिंदखेडराजा येथे मोठ्या प्रमाणात अपघात झाले असून त्यासाठी वाहन चालकांना समुपदेशन अपघात जनजागृती, वाहन तपासणीसाठी केंद्र सुरु करण्यात येणार आहे. श्रेया ट्रॅव्हल्सचा चालक दारूच्या नशेत वाहन चालवीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला त्याचेवर कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत कार चालक 12, ट्रक 5, लक्झरी बस 3 जाणांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यासाठी नशेमधे वाहन चालविण्यार्‍यांची तपासणी करण्यात येईल त्यांना प्रवेशद्वारावर थांबविण्यासाठी पोलिसांच्या मदतीने प्रादेशिक परिवहन विभाग केंद्र दिवसरात्र सुरु ठेवण्यात येणार त्यासाठी सर्व संबधित विभागाच्या बैठकीत उपाय योजना अंमलबजावणी वर चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Powered By Sangraha 9.0