शासनाने विकास कामासाठी जमीन अधिग्रहन करावी : अनिल राठोड

04 Jul 2023 18:44:23
मानोरा,
समाज हिताच्या विरोधात निर्णय घेणार्‍या राजकीय पक्षाच्या विरोधात बंजारा समाज बांधवानी मतदान करावे, तसेच शासनाने ५९३ कोटी रुपयाचा तिर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर केला आहे. परंतु जमिन अभावी विकास कामे करण्यास अडचणी भासत असेल तर, सरकारने तिर्थक्षेत्र विकासासाठी जमीन अधिग्रहन करावी, असे उबाठा शिवसेनेचे (Anil Rathod) अनिल राठोड यांनी ३ जुलैला जगद्गुरु संत सेवालाल महाराज मंदिर परकोट येथे व्यक्त केले.
 
Anil Rathod
 
या बैठकीचे अध्यक्ष माजी वीज मंडळ सदस्य (Anil Rathod) अनिल राठोड होते. मंचकावर महंत कबीरदास महाराज, जितेंद्र महाराज, सुनील महाराज, माजी जि.प.अध्यक्ष दिलीप जाधव, डॉ. सुभाष राठोड, माजी सभापती जयकिसन राठोड, माजी जि. प. सदस्य प्रेम राठोड, सुभाष राठोड, बाजार समिती सभापती गुलाब जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्वांच्या साक्षीने तीन ठराव संमत करण्यात आले. यात श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे वैद्यकीय महाविद्याल देण्यात यावे, विकास कामासाठी शासनाने जमीन अधिग्रहण करून विकास कामे तात्काळ सुरु करावे, राजपूत भामटा समाजातील भामटा समाजातील घुसखोरी बंद करावी, असे ठराव संमत करण्यात आले.
 
 
यावेळी कबीरदास महाराज, जितेंद्र महाराज, दिलीप जाधव, माजी सभापती सुभाष राठोड, पंजाब चव्हाण, डॉ सुभाष राठोड, प्रा. डॉ. जगदीश राठोड यांनी देशभरातील बंजारा समाजाचे एकमेव श्रद्धास्थान पोहरादेवीचा विकास व्हावा यासाठी गावातील सर्वांनी हेवेदावे बाजूला ठेवून विकास साधून घ्यावा, स्वखुशीने विकासासाठी जमीन दान देणार्‍या दात्यांचे सरकार व महंतांनी सत्कार करावा, विकासासाठी शासनाने मंजुर निधीमधून जमीन मोबदला देवून घ्यावे, किंवा अधिग्रहण करून विकास साधून शासनाने निधी देऊ केला तो खर्ची घालावे, असे (Anil Rathod) आवाहन केले. संचालन विलास राठोड यांनी केले, आभार प्रकाश राठोड यांनी मानले. या महत्त्वपूर्ण बैठकीला भाविक व विविध संघटनेचे पदाधिकारी नायक, कारभारी आसामी आदींची उपस्थिती होती.
Powered By Sangraha 9.0