उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात जंगल सफारी सुरु

04 Jul 2023 21:21:20
नागपूर,
पावसाळा सुरु झाला ही जंगलातील रस्ते खराब होत असल्याने (Karhandla Sanctuary) जंगल सफारी बंद करण्याचा निर्णय वनविभाग दरवर्षी घेतो. यंदा देखील १ जुलैपासून पेंच, बोर, उमरेड कऱ्हांडला अभयारण्य जंगल सफारीसाठी बंद देखील करण्यात आले होते. परंतु यंदा पाउस अगदी कमी प्रमाणात झाला. त्यामुळे आणखी काही दिवस जंगल सफारी सुरु ठेवण्याचा निर्णय उमरेड-पवनी-कèहांडला अभयाण्याने घेतला आहे.
 
Karhandla Sanctuary
 
काही दिवसांपूर्वी पावसाने दमदार हजेरी लावली, मात्र नंतर त्याने दडी मारली. पाऊस थांबला असल्यामुळे आणि अभयारण्य क्षेत्रात रस्त्याची स्थिती योग्य असल्याने वनविभागाने मंगळवारपासून पर्यटकांसाठी मर्यादीत स्वरुपात (Karhandla Sanctuary) उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयाण्यातील जंगल सफारी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑफलाइन पद्धतीने जंगल सफारी पुढील आदेशापर्यंत सुरु राहणार आहे, अशी माहिती विभागीय वन अधिकारी(वन्यजीव) महेश ठेंगडी यांनी दिली आहे. यासह पेंच व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रात येणाऱ्या सिल्लारी आणि सुरेगाव पर्यटन गेट येथून ऑफलाइन पद्धतीने मर्यादीत स्वरुपात जंगल सफारीची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
Powered By Sangraha 9.0