तभा वृत्तसेवा
गोंदिया,
उत्तराखंड राज्यातील देहरादून येथे आयोजित राष्ट्रीय खुल्या ज्येष्ठ नागरिक अॅथलेटिक्स स्पर्धेत गोंदियाचे (Munnalal Yadav) ज्येष्ठ धावपटू मुन्नालाल यादव यांनी वयाच्या 81 व्या वर्षीही उत्साह व जिद्द दाखवत नागपूर विभागाला 3 सुवर्णपदके मिळवून ऐतिहासिक विजयाची नोंद केली.
ज्येष्ठ मुन्नालाल यादव (Munnalal Yadav) यापूर्वीही अनेक राज्य, राष्ट्रीय स्तरावरील दौड स्पर्धेत सुवर्ण, कांस्य व रजत पटकावून जिल्ह्याचे नाव गौरविण्यात केले आहे. आजही पहाटे काही किलोमीटर दौड सराव करणारे युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्त्रोत ठरले आहे. दरम्यान देहरादून येथे आयोजित राष्ट्रीय खुल्या स्व. महाराणी महेंद्रकुमार माजी खासदार स्मृती अॅथलेटिक्स स्पर्धेत 100 मीटर, 200 मीटर व 5 किलोमीटर दौड स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून जिल्ह्याचे नाव उंचावले. त्यांनी (Munnalal Yadav) नागपूरचे प्रतिनिधीत्व करत स्पर्धेत 3 सुवर्णपदके जिंकले. त्यांच्या यशाबद्दल पुष्पक जसानी, डॉ. दीपक बहेकार, डॉ. राजेंद्र जैन, डॉ. नितेश वाजपेयी, ठाकूदास मोटवानी, शिव नागपुरे, मंजू कटरे, जयंत शुक्ला, प्रविण गजभिये, गणेश यादव, सुमित यादव, चेतन यादव, अमित यादव, कल्पतरु हेल्थ क्लब परिवार, सायकलिंग संडे ग्रृप व जिल्हावासीयांनी अभिनंदन केले आहे.