नागपूर विभागातील 21 बसस्थानक स्वच्छ, सुंदर होणार

सौंदर्यकरण व सुशोभिकरणाला प्राधान्य
देखभाल- दुरुस्तीचे काम 1 वर्षांसाठी
उत्कृष्ठ काम असल्यास पुन्हा 2 वर्षे मिळणार
संस्थेला उत्पादनाची प्रसिद्धी विक्री करण्याची मुभा

    दिनांक :04-Jul-2023
Total Views |
- नामदेव भदे
 
नागपूर,
Nagpur bus stand : एसटीच्या प्रवाशांना दर्जेदार आणि गुणात्मक सेवा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्व बसस्थानके स्वच्छ- सुंदर करण्याचे ठरविले आहे. यात प्रामुख्याने गणेशपेठ बसस्थानकासह नागपूर विभागातील 21 बसस्थानकाचा समावेश आहे. मुख्यत: स्वच्छ, सुंदर बसस्थानकासह सुंदर व टापटीप प्रसाधनगृहे करण्यासाठी एसटी महामंडळाने निविदा बोलविल्या आहे. जी संस्था अथवा समूह यासाठी इच्छूक असल्यास त्यांना विहीत नमुण्यामध्ये विभाग नियंत्रकाकडे एक प्रस्ताव सादर करावयाचा आहे. निवड झालेल्या संस्थेला (Nagpur bus stand) बसस्थानकांची स्वच्छता सौंदर्यकरण व सुशोभिकरण करण्यासाठी नागपूर विभागातील बसस्थानके सोपविल्या जाणार आहे.

Nagpur bus stand

बसस्थानक आता चकाचक होणार
नागपूर विभागातील (Nagpur bus stand) गणेशपेठ, मोरभवन,पारशिवनी, कळमेश्वर, बुटीबोरी, हिंगणा, कामठी, राजभवन, काटोल, कोंढाळी, नरखेड, मोवाड, जलालखेडा, उमरेड, कुही, सावनेर, खापा, मोहोपा, धापेवाडा, रामटेक, मौदा बसस्थानक आता चकाचक होणार असल्याची माहिती एसटीच्या विभाग नियंत्रकांनी दिली.
 
 
सुंदर बसस्थानक अभियान
एसटी महामंडळाने 1 मे पासून हिंदुहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान सुरू केले असून नागपूर विभागातील 21 बसस्थानके स्वच्छ व सुंदर करण्यासाठी खाजगी संस्थेला 1 वर्षांसाठी जबाबदारी सोपविल्या जाणार आहे. बसस्थानक व परिसराची दैनंदिन स्वच्छता, सुशोभिकरण व (Nagpur bus stand) सौंदर्यीकरण करण्यासोबतच इतर कामे या संस्थेला करावी लागणार आहे. यात सर्व कामांसह देखभाल व दुरुस्ती करण्याचा अधिकार संबंधित संस्थेला मिळणार आहे. संस्थेचे काम उत्कृष्ठ असल्यास हा करार पुढील 2 वर्षांसाठी वाढविण्यात येणार आहे. याबदल्यात संबंधित संस्थेला बसस्थानकांमध्ये त्यांच्या स्वतःच्या उत्पादनाची अथवा सेवेची वर्षभरासाठी जाहिरात प्रसिद्धी विक्री करण्याची मुभा एसटी महामंडळाव्दारे देण्यात येणार आहे.