नागपुरकरांना विनाविलंब नागरी सेवा देणार

04 Jul 2023 20:36:26
नागपूर, 
मनपा आयुक्त तथा प्रशासक म्हणून मला नागरी समस्या प्रत्यक्ष सोडवायच्या आहेत. यासाठी पहिले मी बेसिक प्रश्न जाणून घेतल्यानंतर नागरिकांना विनाविलंब दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रधानक्रम देईल. नागपूरकरांना गुणवत्तापूर्ण सेवा आणि सुविधा देण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त तथा (Dr. Abhijit Chaudhary) प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
 
Dr. Abhijit Chaudhary
 
डॉ. चौधरी (Dr. Abhijit Chaudhary) यांनी मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडून आयुक्तपदाचा तर अजय गुल्हाणे यांच्याकडून स्मार्ट सिटीच्या सीईओ पदाचा पद्भार स्वीकारला. (Dr. Abhijit Chaudhary) डॉ. चौधरी हे 2011 च्या बॅचचे आयएएस असून, संभाजीनगर महापालिकेत त्यांनी आयुक्तपदाची जबाबदारी पार पाडली आहे. पण त्यापूर्वी त्यांनी सांगली, भंडारा या जिल्ह्यातही जिल्हाधिकारी म्हणून कामकाज बघितले आहे. संभाजीनगर येथे जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून काम केल्याचे त्यांनी सांगितले. शहराच्या विकासाच्या बाबतीत बोलताना ते म्हणाले की अधिकार्‍यांशी चर्चा करून शहर विकासाचा रोडमॅप सुरूवातीला तयार करणार आहे. येथील पाणी पुरवठा, ड्रेनेज, उद्यानाची स्थिती, प्रवासी वाहतूक या सुविधा गुणवत्तापूर्ण देण्याचा प्रयत्न राहील. शहराचे सौंदर्यीकरण, पर्यावरणाचे संतूलन याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. जी-20 निमित्त झालेले सौंदर्यीकरण कायमस्वरुपी टिकविण्यावर भर राहणार आहे. त्याचबरोबर महापालिकेकडून ज्या सेवा नागरीकांना पुरविल्या जातात. त्या सेवांचे विकेंद्रीकरण करून नागरिकांना मुख्यालयात येण्याचा त्रास होणार नाही, याचा प्रयत्न राहील. तसेच ऑनलाईन सेवा देण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
गडकरी, फडणवीसांसोबत काम करण्यात आनंदच
शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर विकासाचे व्हिजन आहे. या दोन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनात काम करताना फायदा मिळणार आहे. दीड वर्षापासून महापालिकेत प्रशासक आहे. त्याचा फायदा वेगाने काम करण्यासाठी होवू शकतो. सरकारचे निर्देश जनतेपर्यंत लवकर पोहचविता येतात. स्मार्ट सिटीच्या विकासाचीही जबाबदारी आहे. त्यात बर्‍याच कामाचे वर्क ऑर्डर झाले आहे. डिसेंबरपर्यंत स्मार्ट सिटीचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे काम करण्याचे मोठे आव्हान आहे. रिक्त पदे भरण्यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करू, असेही (Dr. Abhijit Chaudhary) डॉ. चौधरी यांनी एका प्रश्नांच्या उत्तरात सांगितले.
Powered By Sangraha 9.0