नागपूर,
कथ्थक नृत्य मंदिर, नादब्रह्म व्हायोलिन व मैत्री परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी 7 जुलैला कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘नृत्यबेला संगम 2023’ (Nrityabela Sangam) हा कथ्थक व व्हायोलिन वादनाचा कार्यक्रम संध्याकाळी 6.30 वाजता होणार आहे. कथ्थकच्या शास्त्रीय नृत्य प्रदर्शनासोबतच, अजरामर अशी नाट्यगीते, व्हायोलिन आणि नृत्याच्या माध्यमातून सादर होणार आहेत. यात शिरीष व स्वाती भालेराव यांच्या प्रस्तुतीसोबतच त्यांचा शिष्य वर्ग प्रस्तुती सादर करेल. गुरु-शिष्यांची जोडी, या गुरुपौर्णिमेच्या आठवड्यात आपली कला रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
या (Nrityabela Sangam) कार्यक्रमात 85 पेक्षा अधिक वादक व नृत्यांगनांचा समावेश असून वय वर्ष 5 ते 50 वयोगटातील हे कलाकार आहेत. गायिका - मंजिरी अय्यर, दिलरुबा व गायन हृषीकेश करमरकर, साथसंगत तबल्यावर राम ढोक, वेद ढोक, हार्मोनियम अथर्व भालेराव, निवेदनाची धुरा सांभाळणार आहेत श्वेता गर्गे. कार्यक्रम निःशुल्क आहे.