वाशीम जिल्हा पोलिस दलाला ४ सुवर्ण पदक

Washim Police रजत, कास्यपदकासह १४ पदकाची कमाई

    दिनांक :05-Jul-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
 
वाशीम,
Washim Police अमरावती परिक्षेत्रीय पोलिस कर्तव्य मेळावा नुकताच अकोला पोलिस घटकामध्ये पार पडला. सदर कर्तव्य मेळाव्याकरिता अमरावती परिक्षेत्रातील एकूण ५ जिल्हा पोलिस घटकांनी सहभाग नोंदविला होता.Washim Police त्यामध्ये वाशीम पोलिस दलातील ५ पोलिस अधिकारी व ११ पोलिस अंमलदार अशा एकूण १६ पोलिस अधिकारी - अंमलदारांनी सहभागी होत १४ पदकांची कमाई करत परिक्षेत्रातील उपविजेतेपद पटकाविले आहे.
 
 

Washim Police 
 
 
Washim Police त्यामध्ये पो.नि.रामेश्वर चव्हाण यांनी गुन्हे तपास, कायदे व नियम पद्धती व न्यायनिर्णय लेखन या विषयात सुवर्ण पदक, पोहवा. महेश आखरे यांनी घटनास्थळ निरीक्षण चाचणीमध्ये सुवर्ण पदक, पोहव जयप्रकाश सुपारे व धनंजय पवार यांनी वाहन तपासणीमध्ये सुवर्ण पदक तर पो.शि.व्यंकटेश रावलेवाड यांनी श्वान रॉयसह अंमली पदार्थ शोधक चाचणीमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.
 
 
तर फिंगर प्रिंट प्रात्यक्षिकमध्ये स.पो.नि. महेंद्रा गवई यांना रजत पदक, फोरेन्सिक सायन्स लेखी परीक्षेमध्ये पोहवा महेश आखरे यांना रजत पदक, लेबलिंग पॅकींगमध्ये सपोनि महेंद्र गवई, पोउपनि विजय चव्हाण व पोहवा महेश आखरे यांना रजत पदक, फोटोग्राफी टेस्ट व पोलिस पोट्रेट टेस्टमध्ये पो.उपनि सचिन गोखले यांना २ रजत पदक, रूम सर्च मध्ये नापोकॉ धनंजय पवार यांना रजत पदक तर ग्राउंड सर्चमध्ये पो.कॉ. कान्होबाराव म्हस्के यांना रजत पदक मिळाले आहे. Washim Police त्याचबरोबर पोलीस पोट्रेट टेस्टमध्ये पोहवा महेश आखरे यांना कास्यपदक व पो.कॉ. गोपाल चौधरी यांनी संगणक जनजागृती स्पर्धा तोंडी परीक्षेमध्ये कास्य पदक पटकाविले आहे. अश्याप्रकारे सुवर्ण पदक ४, रजत पदक ७ व कास्य पदक ३ असे एकूण १४ पदकांची कमाई करत वाशीम जिल्हा पोलिस दलाच्या संघाने अमरावती परिक्षेत्रातून विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे.