सिंधू, सेन उपांत्यपूर्व फेरीत

    दिनांक :07-Jul-2023
Total Views |
- कॅनडा ओपन बॅडमिंटन

कॅलगरी, 
स्टार भारतीय बॅडमिंटनपटू P. V. Sindhu-Lakshya Sen पी. व्ही. सिंधू व लक्ष्य सेनने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदवून कॅनडा ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत अनुक‘मे महिला व पुरुष एकेरी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. जपानच्या नात्सुकी निदायराकडून पुढे चाल मिळाल्यानंतर पी. व्ही. सिंधूने अंतिम आठमध्ये प्रवेश केला, तर सेनने ब‘ाझीलच्या यगोर कोएल्होवर 31 मिनिटांत 21-15, 21-11 असा विजय मिळवला.
 
 
P.-V.-SINDHU
 
P. V. Sindhu-Lakshya Sen आता उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा सामना 2022 ची इंडोनेशिया मास्टर्स विजेती गाओ फँग जी हिच्या होईल. गाओ फँग जीने यावर्षी आशिया मिश्र सांघिक स्पर्धेत चीनच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता लक्ष्य सेनची लढत बेल्जियमच्या ज्युलियन कॅरागीशी होणार आहे. तथापि, कृष्ण प्रसाद गारागा आणि विष्णुवर्धन गौड पंजाला उप-उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा टप्पा पार करू शकले नाहीत. त्यांना इंडोनेशियाच्या दुसर्‍या मानांकित आणि जागतिक क‘मवारीत 7 व्या क‘मांकावर असलेल्या मोहम्मद अहसान व हेंद्रा सेटियावान या जोडीकडून 9-21, 11-21 असा पराभव पत्करावा लागला.