शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहा : अनिल राठोड

उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन

    दिनांक :08-Jul-2023
Total Views |
मानोरा, 
शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वाशीम व यवतमाळ जिल्ह्याच्या दौर्‍यावर ९ जुलै ला येत असून, या दौर्‍यानिमीत्त ते पदाधिकारी, कार्यकर्ते यांचेशी संवाद साधणार आहेत, तरी वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी व यवतमाळ येथे जोणार्‍या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी वीज मंडळ सदस्य Anil Rathod अनिल राठोड यांनी केले आहे.
 
Anil Rathod
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ९ जुलै रोजी वाशीम व यवतमाळ जिल्हा दौर्‍यावर येत असून, या दौर्‍यादरम्यान Anil Rathod ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज, संत डॉ. रामराव महाराज यांच्या समाधीस्थळाला भेट, दर्शन घेवून कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते पुढील दौर्‍यासाठी दिग्रस येथे महेश कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यकर्ता संवाद मेळाव्याला संबोधित करणार आहेत. या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला वाशीम व यवतमाळ जिल्ह्यातील बहुसंख्य शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी वीज मंडळ सदस्य Anil Rathod अनिल राठोड यांनी केले आहे.