गडचिरोली,
Gadchiroli district गडचिरोली जिल्ह्यात पालकमंत्री सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश चिटणीस रेखा डोळस यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शनिवारी आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे गडचिरोलीत आले असता, डोळस यांनी ही मागणी केली. यावेळी रेखा डोळस यांनी प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी यांची मुख्यालयात मोठ्या संख्येने अनुपस्थिती या गंभीर विषयावर चर्चा करून तत्काळ यावर राज्य सरकारच्या वतीने उपाययोजना करण्यात यावी, अशीही मागणी केली.

तसेच गडचिरोली जिल्हा आदिवासीबहुल उद्योगविरहित जिल्हा असून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या जिल्ह्यातील समस्या, Gadchiroli district अधिकारी व कर्मचार्यांवर वचक राहण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व आपण स्वीकारावे अशीही मागणी रेखा डोळस यांनी ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावेळी त्यांन या मागणीला दुजोरा दिला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य अटल अर्थ सहाय्य योजनेंतर्गत राज्य सरकारद्वारे 77 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. सदर रक्कम समस्त सहकारी संस्थांना वाटप करण्यात येणार आहेत. त्याबद्दल राज्य सरकारचे रेखा डोळस यांनी आभार मानले.