यवतमाळ,
स्थानिक दहिवलकर प्लॉट येथील देवांशू संगीत विद्यालयात Gurupurnima festival गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांना सुगम संगीताच्या गायनाच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
दहिवलकर प्लॉट येथे नियमित सुरू असणार्या देवांशू संगीत विद्यालयात Gurupurnima festival गुरुपौर्णिमेच्या दिवशी सरस्वती मातेची पूजा, प्रार्थना व विविध गीते सादर करून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. याच गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून देवांशु संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाषण व गुरु पौर्णिमा कार्यक‘मावर आधारित विविध गीते सादर केली व काही विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी देवांशू संगीत विद्यालयाच्या संचालक मनीषा राहुल ढोणे यांनी विद्यार्थ्यांना प्राचीन गुरू-शिष्य परंपरा कशी होती आणि ही गुरू-शिष्य परंपरा नवीन पिढीला माहित व्हावी, या उद्देशाने Gurupurnima festival गुरुपौर्णिमेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यावेळी कार्यक‘माला उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये कमल ढोणे, भारती जिरापुरे, जोशी, वखरे, ठाकरे, सुरेखा ढोणे, देवांशू ढोणे, दर्शन ढोणे, पलक काटकर, हेतल रवराशे, क्षीतिजा डेहनकर, लावण्या शेलेकर, स्वराली बंकेवार, ज्ञानेश्वरी येवले, रोहांशू रवराशे, पूर्वजा काटकर, शिवांश वानखेडे, लावण्या वखरे, अनन्या कुरवाळे, अनुष्का आहेर, आर्या ठाकरे, आदिती खापर्डे, राधा जोशी, सानवी जिरापुरे हे सर्व उपस्थित होते.