यवतमाळ,
येथील प्रतिथयश छायाचित्रकार Mahesh Waghmare महेश वाघमारे यांना ‘वन ऑफ द बेस्ट फोटोग्राफर इन महाराष्ट्र’ हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कुटुंबाची बिकट परिस्थिती सावरण्यासाठी फोटोग्राफी व्यवसायाचा मार्ग निवडून त्यांनी ही परिस्थिती सावरली. त्यांनी छायाचित्रणाचा अत्यंत खडतर प्रवास पार करीत हे यश त्यांनी मिळविले. अनेक आव्हानांना तोंड देऊन महेश वाघमारे यांनी या क्षेत्रांत क्षितिज गाठले.
या संपूर्ण प्रवासाचे कुठेतरी कौतुक व्हायलाच हवे. म्हणूनच ‘रेसिल इन’ या संस्थेने व्यावसायिक आणि सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र बिझनेस आयकॉन ‘वन ऑफ द बेस्ट फोटोग्राफर इन महाराष्ट्र’ हा पुरस्कार प्रदान केला. शनिवार, 8 जुलै रोजी नाशिकमधील प्रसिद्ध हॉटेल ‘रेडिसन ब्लू’मध्ये प्रदान करण्यात आला. या दिमाखदार सोहळ्यात केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि तारक मेहता मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री बबिता (मुनमुन दत्ता) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून याद्वारे Mahesh Waghmare महेश वाघमारे यांचा कार्याचा आणि जीवनाचा गौरव केला.