सरस्वती विद्यालयात विज्ञान प्रदर्शन

09 Jul 2023 17:37:06
तभा वृत्तसेवा
अर्जुनी/मोर.,
स्थानिक संचालित Saraswati Vidyalaya सरस्वती ज्ञानदीप कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम विद्यालयाते शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनी मध्ये वनस्पती पेशी, प्राणी पेशी, क्लोरोप्लास्ट, नायट्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र या विविध विषयावरती विद्यार्थ्यांनी आपल्या कला शक्तीने तयार केलेले मॉडेल्स ठेवण्यात आले होते.
 
Saraswati Vidyalaya
 
विविध गटामध्ये व काही वैयक्तिक मॉडेल्स या ठिकाणी विद्यार्थ्यांनी तयार केलेले 60 मॉडेल्स यामध्ये ठेवण्यात आले होते. Saraswati Vidyalaya प्रदर्शनीची पाहणी संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश भैया, संस्थेचे सचिव सर्वेश भुतडा, प्राचार्य जे. डी. पठाण, भगीरथ गांधी, प्राचार्या शैव्या जैन, घाटे, पर्यवेक्षक लुटे उपस्थित होते. प्रदर्शनीच्या यशस्वीतेसाठी विज्ञान शिक्षक कोटांगले, चेताली पालिवाल, मोनिका बलगुजर, स्नेहा चव्हाण, किशोर सोनटक्के, शेळके आदींनी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0