मालेगाव,
Annabhau Sathe लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १ ऑगस्ट रोजी १०३ वी जयंती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशन द्वारा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी शोभायात्रेत मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते.शहरातील वीर लहुजी चौक गांधीनगर येथून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशन द्वारा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. तत्पूर्वी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य तैल चित्राचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच त्यांना जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यानंतर या शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली.

पारंपारिक वाद्यासह अश्व आणि अण्णाभाऊ साठे यांचा देखावा या शोभायात्रेत करण्यात आला होता. ही शोभायात्रा गांधीनगर वीर लहुजी चौक येथून निघून तहसील कार्यालय समोरून मुख्य रस्त्याने जात असताना शोभायात्रेत महिला पुरुषासह युवक व बालगोपालांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.Annabhau Sathe या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पद्मश्री नामदेव कांबळे, माजी सरपंच विवेक माने, अभिषेक मुंदडा, संतोष तिखे, आनंद बिर्ला, डॉ. पवन मानधने, चेतन काबरा, सागर अहिर, अभी घुगे, डॉ. उमेश तारे, आशुतोष कंकाळ, दादासाहेब ढोबळे, भिकाजी ढगे, अरुण बळी, संजय केकन, संदीप पिंपळकर, रवी कांबळे, विनोद जोगदंड, सागर देवकते, गजानन जाधव आदी मान्यवरांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
शहरातून काढण्यात आलेल्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या शोभायात्रेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते तर यावेळी गांधीनगर वीर लहुजी चौक येथील अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेजवळ आकर्षक सजावट करण्यात आली होती.