तभा वृत्तसेवा
वणी,
करंजी ते नागभीड-क्रम्हपुरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 वरील Wardha River वणी येथून वरोरा राष्ट्रीय महामार्गावरील पाटाळा येथे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नवीन पुलाला पहिल्याच पुरात भेगा पडल्या आहेत. दोन ठिकाणी पूल एका बाजूने तीन ते चार इंच दबला आहे. त्यामुळे वाहनचालक प्रवास करताना घाबरत आहेत. पुलाखाली पावसाचे व धरणाचे पाणी असल्याने तेथे पुलाला काही धोका निर्माण झाल्यास पूर्ण राष्ट्रीय महामार्ग बंद होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पुलाचे काम चांगले झाले असून नवीन पुलाला कोणताही धोका नाही, असा दावा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने केला आहे.
वणी तालुक्यातून Wardha River चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यात जाण्यासाठी वणी ते वरोरा हा नवीन राष्ट्रीय महामार्ग नुकताच तयार झाला आहे. या महामार्गावर जुन्या पाटाळा पुलाच्या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात आला आहे. मार्च 23 मध्ये पाटाळा पुलाचे काम पूर्ण झाले. मात्र पुलाचे काम पूर्ण होताच, पुलाच्या आरसीसी बांधकामाला भेगा पडण्यास सुरवात झाली. त्यात सिमेंट बांधकाम करताना तेथे पाण्याचा वापर कमी प्रमाणात करण्यात आला. मात्र आरसीसी बांधकाम होताना पाण्याचा वापर केला गेला जात नव्हता आणि त्यावेळी मे महिन्यातील कडक उन होते. त्यामुळे बांधकाम सुरू असतानाच पुलाच्या सर्व भागांत भेगा पाडण्यास सुरवात झाली होती.
त्यातच शुक्रवारी पूल काही ठिकाणी दोन ते तीन इंच दबलेला आढळला. Wardha River ही बाब लक्षात येताच कंत्राटदाराने ताबडतोब चुरी आणून ते समपातळीत केले व भेगासुद्धा बुजविण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र कायम अवजड वाहनांची वाहतूक होणार्या या राष्ट्रीय महामार्गावरील या पुलाची स्थिती अवजड वाहनांची वाहतूक झेपणारी आहे काय, असा प्रश्न या मार्गाने ये-जा करणार्या वाहनचालकांना भेडसावत आहे.
पुलाला कोणताही धोका नाही
पाटाळा गावापासून वणीकडे येताना बनविलेल्या Wardha River पुलाचे काम हे चांगल्या दर्जाचे झाले आहे. मी आताच पाहणी करून आलो. अॅप्रोचमध्ये इश्यू आला आहे. सॅच्युरेशनमुळे हा प्रकार झाला आहे. पुलाचे काम चांगले झाले असून नवीन पुलाला कोणताही धोका नाही, असे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे वरिष्ठ अभियंता अभिजित जिचकार यांनी स्पष्ट केले.