नागपूर,
Shravansari स्त्री हुंकार महिला मंडळ, इतवारी नागपूर या संस्थेतर्फे रविवार, ३० जुलै रोजी बुजुरकर श्रीराम मंदिरात श्रावणसरी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात महाराष्ट्रीयन वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. Shravansari सोळा ते साठ वर्षांवरील महिला यात सहभागी झाल्या. त्यात प्रथम क्रमांक गायत्री नागपुरे यांनी पटकावला.
Shravansari परीक्षक म्हणून स्माईल ट्री फाऊंडेशनच्या अध्यक्ष स्वाती वंजारी आणि ॲड. संध्या बागडदेव यांनी काम बघितले. संस्थेच्या अध्यक्ष देवयानी कळमकर यांनी प्रसार माध्यमांद्वारे जी अश्लीलता समाजात फोफावते आहे त्यावर सरकारने ताबडतोब निर्बंध घालावे, असे आवाहन केले. Shravansari संचालन अर्चना पांडे तर आभार प्रदर्शन मंजूषा जोशी यांनी केले. उपाध्यक्ष स्मिता कोठडी, सचिव, मेघा शहाणे, संस्थेच्या कार्यकर्त्यां आणि प्रचंड संख्येने महिलावर्ग उपस्थित होता.
सौजन्य : आनंद कळमकर, संपर्क मित्र