मालेगाव शहराचा पाणी लागला प्रश्न मार्गी

01 Aug 2023 19:56:33
मालेगाव,
water supply मालेगाव शहराचा अतिरिक्त पाणी प्रश्न मार्गी लागला असून भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रमुख अ‍ॅड. नकुल देशमुख व भाजप तालुकाध्यक्ष सुरेश मुंडे यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.मालेगाव शहराचा पाण्याचा प्रश्न एक महत्वाचा विषय बनला होता. मोठ्या प्रमाणात शहरातील नागरिकांना या समस्येला सामोरे जावे लागत होते. १३ एप्रिल रोजी रिसोड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य संकल्प सभा पार पडली होती. या सभेत राज्याची माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मालेगाव शहराचा पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. त्यात सभेत उपमुख्यमंत्र्यांनी सदर मागणी मान्य करत लवकरात लवकर हे प्रश्न सोडवण्यासंदर्भात आश्वस्त केले होते. यासंदर्भात हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी भारतीय जनता पक्षाचे रिसोड - मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अ‍ॅड. नकुल देशमुख व भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश मुंडे यांनी सातत्याने प्रयत्न केला.
 
 Water Problem
 
या संदर्भात शासन निर्णय झाला असून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने हा शासन निर्णय जाहीर केला आहे. मालेगाव पाणीपुरवठा योजना, चाकातीर्थ बृहत लघु पाटबंधारे योजना अंतर्गत १.४२६ वाढीव दलघमी वाढीव म्हणजेच एकूण २.३२६ दलघमी पाण्याचा हक्क मंजूर केला.water supply असून यामुळे शहरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. रिसोड येथील सभेत माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी केलेल्या मागणीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्याने हे काम मार्गी लावले असून या कामासाठी अ‍ॅड. नकुल देशमुख व सुरेश मुंडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यास व प्रयत्नांना यश आले असून हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
Powered By Sangraha 9.0