मायक्रो फायनान्समध्ये लाखोंंची अफरातफर

10 Aug 2023 19:23:20
तभा वृत्तसेवा
महागाव,
finance मायक्रो फायनान्समध्ये कार्यरत असलेल्या सात कर्मचाèयांनी सभासदांकडून वसूल केलेल्या ४४ लाख ७४ हजार रुपयांची अफरातफर केल्या प्रकरणी महागाव पोलिसांनी ५ आरोपींना जेरबंद केले असून दोन आरोपी फरार झाले आहेत.
महागाव येथे इंडसइंड बँक अंतर्गत भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड कंपनीची शाखा असून या शाखेमार्फत महिलांना उद्योगधंद्यासाठी कर्ज पुरवठा केला जातो व दर आठवड्याला या सभासदांकडून कर्जवसुली केली जाते.
 
 मायक्रो
 
ही जबाबदारी शाखेत कार्यरत प्रवीण राऊत (वय ४०, कोपरा, बाभुळगाव), खेमदेव नारायण भंडारे (वय २५, साखरा, घाटंजी), शिवप्रसाद सुरेश सूर्यवंशी (वय २७, करंजी, हिमायतनगर), गणपत बापूराव वाढवे (वय २८, रुई, हदगाव), निरंजन सुदाम गुरनुले (वय २४, कनकी, किनवट), शेख युनुस शेख रज्जाक (वय २२, बळीरामपूर, नांदेड), अर्जुन विष्णू सोनटक्के (वय २१, वसंतनगर, यवतमाळ) या कर्मचाèयांकडे होती.भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड कंपनीने तालुक्यातील अनेक गावांत कर्जवाटप केलेल्या १८७ महिला सदस्यांकडून ४४ लाख ७३ हजार ६९१ रुपये या कर्मचाऱ्यांनी वसूल करून स्वतःच्या फायद्याकरिता वापरून कंपनी व कर्ज घेणाऱ्या  १८७ सदस्यांची आर्थिक फसवणूक केल्याची बाब लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाली.
finance या शाखेचे युनिट व्यवस्थापक निलेश अशोक उपासे यांनी महागाव पोलिसांत तक्रार केली असता सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी तथा ठाणेदार विनायक कोते यांनी आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची ३ पथके नेमली.या पथकांनी परिश्रम घेऊन बाभुळगाव, घाटंजी, हदगाव, किनवट, नांदेड असे वेगवेगळ्या ठिकाणी असलेले आरोपी प्रवीण राऊत, खेमदेव भंडारे, गणपत वाढवे, निरंजन गुरनुले, युनुस शेख यांना ताब्यात घेऊन काही तासांतच अटक केली आहे. तर शिवप्रसाद सूर्यवंशी व अर्जुन सोनटक्के हे आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. आरोपींची ११ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी झाली आहे.ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक विनायक कोते, दीपक ढोमणे, केशव पुंजरवाड, नीलेश पेंढारकर, संतोष जाधव, सुहास कायटे, गजानन जाधव, सुनील जाधव, वसीम शेख, विष्णू काईट यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0