शहरातले साफसफाई कंत्राटदार आक्रमक

10 Aug 2023 20:47:50
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
महापालिके अंतर्गत शहरातल्या 23 प्रभागात (Cleaning contractors) साफसफाईचे काम करणार्‍या कंत्राटदारांनी सहा महिन्यापासून कामाचे देयक न मिळाल्याने गुरूवारी आक्रमक भूमिका घेऊन कर्मचार्‍यांसह मनपा कार्यालयावर धडक दिली. 15 ऑगस्टपर्यंत देयक न मिळाल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
 
Cleaning contractors
 
अमरावती मनपा साफसफाई कंत्राटदार असो.च्यावतीने आजचे Cleaning contractors आंदोलन करण्यात आले. शहरातल्या 23 प्रभागातील साफसफाई कंत्राटी पद्धतीने होते. 23 प्रभागासाठी 23 कंत्राटदार नेमण्यात आले आहे. या कंत्राटदारांना गेल्या सहा महिन्यांपासून साफसफाईचे देयकच देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे काम करणार्‍या कर्मचार्‍यांचेपण वेतन थकले आहे. पैशाअभावी डिझेल पुर्तता करण्यासह उपकरणांची डागडुजी करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहे. या संदर्भात असोसिएशनने वारंवार मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, प्रशासनाने कोणतीच दखल न घेतल्यामुळे अखेर सर्व कंत्राटदार आपल्या कर्मचारी व कचरा संकलन वाहनांसह गुरूवारी मनपा कार्यालयावर धडकले.
 
 
अचानक झालेल्या आंदोलनाने मनपा परिसरात खळबळ उडाली. (Cleaning contractors) जोरदार घोषणबाजी झाल्याने वातावरण तापले होते. सहा महिन्यापैकी 4 महिन्यांचे देयक 15 ऑगस्टपर्यंत न मिळाल्यास सर्व कंत्राटदार व कर्मचारी त्याच दिवशी झेंडावंदनाच्या वेळी मनपा परिसरात येऊन ठिय्या आंदोलन करतील, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. हे निवेदन मनपा आयुक्तांना देण्यात आले आहे. आता मनपा प्रशासन काय करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आंदोलनात असो.चे अध्यक्ष संजय माहुलकर, सचिव सचिन भेंडे यांच्यासह सुनील वरठे, विजय मलिक, विजय गंगण, अनुम बिजवे, निरंजन विरूळकर, शाम शिनगारे, संजय हिरपुरकर यांच्यासह अन्य मोठ्या संख्येने हजर होते.
Powered By Sangraha 9.0