प्रत्येक घरावर अभिमानाने फडकवा तिरंगा- सुधीर मुनगंटीवार
‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन
चंद्रपुरातील निवासस्थानी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले ध्वजारोहण
दिनांक :13-Aug-2023
Total Views |
चंद्रपूर,
Sudhir Mungantiwar भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता होत असून आपण आता शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल करणार आहोत. अशात प्रत्येक घरावर अभिमानाने तिरंगा फडकवूया आणि ‘हर घर तिरंगा’ या अभियानाला चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
‘हर घर तिरंगा’ स्वातंत्र्याचा उत्सव १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने ना. श्री. मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर येथील निवासस्थानी ध्वजारोहण केले . याप्रसंगी त्यांनी जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, १३ ते १५ ऑगस्ट या तीन दिवसांत राष्ट्रध्वजाचा संपूर्ण आदर राखत प्रत्येक घरावर तिरंगा दिमाखदारपणे फडकवावा. Sudhir Mungantiwar तिरंगा हा प्रत्येक भारतीयाची राष्ट्रीय अस्मिता आहे.’ अबाल वृद्धांमध्ये देशाभिमान जागृत राहावा यासाठी देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापासून ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू केले. चंद्रपूर जिल्ह्यातून या अभियानाला यापूर्वी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यंदाही पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत चंद्रपुरातील जनता ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होईल, असा विश्वासही ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.