रौनक साधवानीला उपविजेतेपद

13 Aug 2023 17:46:51
नागपूर, 
Raunak Sadhwani सेंट लुईस(अमेरिका) येथे आयोजित आंतरराष्ट्रीय समर क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत नागपूर येथील ग्रॅण्डमास्टर रौनक साधवानीने उपविजेतेपद पटकाविण्याची कामगिरी केली आहे.स्पर्धेत १७ वर्षीय रौनकने नऊ फेऱ्यांपैकी तीनमध्ये प्रतिस्पर्धीला नमविले, तर पाच फेऱ्यांमध्ये  बरोबरीत रोखले. एका सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला.
 

Tanay Bansod 
 
या कामगिरीच्या बळावर नऊ फेèयामुळे रौनकने गुणसंख्या ५.५ करीत उपविजेतेपद पटकाविले. गेल्या महिन्यात सर्बिया ओपन बुद्धिबळ स्पर्धेतील मास्टर्स कॅटेगरीत रौनकने विजेतेपद पटकाविण्याची कामगिरी केली होती. Raunak Sadhwani सर्बिया येथील स्पर्धेतील यशानंतर या स्पर्धेतही उपविजेतेपद पटकाविल्याबद्दल रौनकने आनंद व्यक्त करून भविष्यात विविध स्पर्धा खेळताना उत्कृष्ट कामगिरी करणे, हेच माझे ध्येय राहणार असल्याचे त्याने सांगितले.
Powered By Sangraha 9.0