अट्टल मंगळसूत्र चोरटा गजाआड

14 Aug 2023 20:42:13
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
शहरातील मंगळसूत्र चोरट्यांच्या Attal Mangalsutra Chor घटना वाढत असताना पोलिसांनी मंगळसूत्र चोरून नेणार्‍या चोरट्यास पकडण्यात यश मिळविले आहे. याबाबतची माहीती आज सोमवारी पत्रपरिषदेत पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली. पोलिस आयुक्तालय येथे आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी सांगितले की, वलगांव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या संताजी नगर येथील एक 87 वर्षीय महिलेचे मंगळसूत्र 2 ऑगस्टला त्या घरात एकट्याच असताना 30 ते 35 वर्षीय युवकाने चोरून नेले होते. नळ व गॅस बंद करण्याचे कारण सांगून हा युवक वृद्धेच्या घरात आला होता.
 
Attal Mangalsutra Chor
 
याच दरम्यान त्याने वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र Attal Mangalsutra Chor पळविले होते. याप्रकरणी वलगांव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. चोरट्याने महिलेच्या गळ्यातील 30 हजार रूपये किंमतीचे 9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले होते. अशाच प्रकारची दुसरी घटना राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या साईनगर येथे घडली होती. येथील एका महिलेच्या गळ्यातील 25 हजार रूपये किंमतीचे मंगळसूत्र चोलन नेले होते. अशाच प्रकारची घटना फ्रेजरपुरा येथे घडली होती. चोरट्याने या महिलेच्या गळ्यातील 12 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले होते.
 
 
पोलिसांनी याप्रकरणात शहरातील मनीष अनिल जोशी (30, पार्वतीनगर) यास ताब्यात घेतले. त्याच्याजवळून चोरी करण्यात आलेले मंगळसूत्र, दुचाकी व मोबाईल जप्त करण्यात आला आहे. चोरट्याने मंगळसूत्र विकून मिळविलेले 1 लाख हजार 45 हजार रूपये पोलिसांनी जप्त केले आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त विक्रम साळी, सहाय्यक आयुक्त पूनम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठच्या वरिष्ठ निरीक्षक सीमा दाताळकर, उपनिरीक्षक गंगाधर जाधव, कर्मचारी प्रशांत गिरडे, अमोल खंडेझोड, सूरज मेश्राम यांनी केली.
Powered By Sangraha 9.0