तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Loan Schemes शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ शाखा कार्यालय यवतमाळ व मुख्यकार्यालय नाशिकमार्फत राबविण्यात येणार्या कर्ज योजनेसाठी विहित नमुन्यातील अर्ज उद्योगभवनातील शाखा कार्यालयात उपलब्ध करण्यात आले आहेत. या कर्ज योजनेत 95 टक्के सहभाग महामंडळाचा तर 5 टक्के सहभाग लाभार्थ्यांचा राहणार असून इच्छुक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे महामडंळाच्या शाखा व्यवस्थापकांनी केले आहे.इच्छुकांनी प्रस्ताव संपूर्ण कागदपत्रासह अर्ज 31 ऑगस्टपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. या मुदतीनंतर आलेले प्रस्ताव मुख्यालयाच्या सूचनेनुसार स्वीकारले जाणार नाहीत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

या कर्ज योजनेतून सहा स्वयंसहायता बचतगट योजना, दोन प्रवासी वाहन व्यवसाय, दोन मालवाहतूक वाहन व्यवसाय, तीन ऑटो रिक्षा व्यवसाय व एक आदिवासी विविध कार्यकारी संस्था असा लक्षांक प्राप्त झाला आहे. उद्दिष्टांच्या 1:1.5 या प्रमाणात अंतीम मंजुरीसाठी सादर करावयाचे आहेत.Loan Schemes या कर्ज योजनेसाठी व्यवसायाचे प्रस्ताव सादर करताना जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा टीसी, उत्पनाचा दाखल, शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्र, आदिवासी विभागात नाव नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, प्रकल्प अहवाल, रेशन कार्ड, व्यवसायाचे कोटेशन, वाहनचालविण्याचा परवाना, लाभार्थी व एक जामीनदाराचा सातबारा किंवा घराचा आठ अ नमुना, दोन फोटो, बँकेचे निलचे दाखले व ग‘ामपंचायत किंवा नगरपरिषदचे नाहरकत प्रमाणपत्र हे कागदपत्र फाईल सोबत जोडणे आवश्यक आहे.अर्जाची किंमत 10 रुपये असून लाभार्थ्यांनी स्वत:चे ओळखपत्र किंवा आधारकार्ड दाखवून व्यवसायाचा अर्ज प्राप्त करून घ्यावा, प्रतिनीधी पाठवू नये, असे आवाहन शाखा व्यवस्थापक शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादीत नाशिक शाखा कार्यालय यवतमाळ यांनी केले आहे.