डॉ. उमेश रेवनवार रोटरी क्लब पुसद डिस्टिक अवॉर्डने सन्मानित

14 Aug 2023 16:50:28
तभा वृत्तसेवा
पुसद, 
Distic Award पुसदमध्ये 2022-23 च्या कार्यकाळात डोळ्यांविषयी पुसद रोटरी क्लबतर्फे जनजागृती अभियान राबवल्याबद्दल रोटरी डिस्टिक 3030 ने ‘केअर ऑफ आईज’ या डिस्टिक अवॉर्डनी डॉ. उमेश रेवनवार नेत्ररोग तज्ञ व रोटरी क्लब पुसदला सन्मानित केले.डोळ्याविषयी उत्कृष्ट कार्याबद्दल पुसदमध्ये मागील वर्षी नेत्रदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, काचबिंदू तपासणी शिबिर, दृष्टीपटल रेटिना तपासणी शिबिर, शाळेतील मुलांची डोळ्यांची तपासणी, विटामिन ए जनजागृती अभियान, मोतीबिंदूच्या शस्त्रकि‘या शिबिर, इत्यादी सामाजिक कार्याबद्दल डिस्टिकने सन्मानित केले आहे.
 
 अवर्ड
 
 
हा पुरस्कार घेण्यासाठी रोटरी क्लब पुसदचे माजी अध्यक्ष रोटे. गजेंद्र निकम सचिव रोटे स्वप्निल चिंतामणी, अध्यक्ष डॉ. विश्वास डांगे, सचिव श्रीराम पद्मावार, डॉ. उमेश रेवनवार, डॉ. उत्तम खांबाळकर, सुधाकर ठाकरे, बजाज व इतर सदस्य उपस्थित होते.Distic Awardया पुरस्काराबद्दल पुसदमध्ये रोटरी क्लब पुसद व डॉ. उमेश रेवणवार यांचे माजी आमदार मनोहर नाईक, आमदार इंद्रनील नाईक, ययाती नाईक, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, आमदार अ‍ॅड. निलय नाईक, शरद मैंद, डॉ. मोहम्मद नदीम, अ‍ॅड. उमा पापीनवार, दीपक आसेगावकर व विविध संस्थेकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0