सिरोंचा,
Godavari सिरोंचा तालुक्याला लागूनच गोदावरी नदी वाहते. पावसाळ्याचे दिवस असल्याने सध्या ही नदी दुथडी भरून वाहत आहे. असे असतानाही आंघोळीसाठी अतिउत्साही असलेल्या दोन युवकांना गोदावरी नदीपात्रात जलसमाधी मिळाल्याची घटना जानमपल्ली चेकपासून काही अंतरावर असलेल्या नगराम नदी घाटावर घडली. सुमन राजू मंसेट्टी (१५) रा. आसरअल्ली व हिमांशू मून (२२) रा. न्यू बालाजी नगर नागपूर अशी मृतकांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, हिमांशू मून हा नागपूर येथून आपल्या काही मित्रांसह कार्यक्रमासाठी सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली येथे गेला होता.

दरम्यान, आज सकाळी तो आपल्या मित्रांसह सुमन मुंसेट्टी याला भेटण्यासाठी सिरोंचापासून ८ किमी अंतरावरील चिंतलपल्ली येथे गेला. येथून हिमांशू व सुमन तसेच कार्तिक पडाला, नलिन पडाला व रंजित पडाला हे पाच जण गोदावरी नदीवरील नगरम घाटाकडे आंघोळीचा बेत करून निघाले. Godavari येथे गेल्यानंतर आंघोळीसाठी सर्वजण नदीपात्रात उतरले. पावसामुळे गोदावरी नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असल्याने सुमन मंसेट्टी व हिमांशू मून व अन्य एकजण खोल पाण्यात बुडू लागले. मात्र अन्य एक व इतर दोघे असे तिघेजण कसेबसे पाण्याबाहेर निघाले. मात्र पाण्याच्या प्रवाहाने हिमांशू व सुमन दूर वाहत जावून त्यांचा मृत्यू झाला. यांना वाचवण्यासाठी सिरोंचा येथील आपत्ती व्यवस्थापन टीमने प्रयत्न केले मात्र त्यांना यश प्राप्त करू शकले नाही पुढील तपास सिरोंचा पोलिस करत आहे