सालेकसा येथे आढळले चार पिल्लांसह दुर्मिळ जातीचे उदमांजर

14 Aug 2023 18:57:27
तभा वृत्तसेवा
सालेकसा, 
Saleksa स्थानिक शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत 14 ऑगस्ट रोजी चार पिल्लांसह दुर्मिळ असे उदमांजर म्हणजेच मसण्या उद आढळले. या दुर्मिळ जातीच्या प्रजातीची नोंद सालेकसामध्ये प्रथमच झाली आहे. दरम्यान वनविभागाने उदमांजर व तिच्या तीन पिल्ले ताब्यात घेऊन जंगलात सोडले. तर एक पिल्लू पळून गेले.
 
 
Saleksa
 
इंग्रजीमध्ये उदमांजराला एशियन पाम स्वीट असे म्हणतात. त्याचे वैज्ञानिक नाव प्याराडॉक्सूरस हर्माफ्रोडीटस असे आहे. विशेष म्हणजे हे मांजर नसून एक विशिष्ट प्रकारचा सिव्हेट कुळामध्ये आढळणारा हा प्राणी आहे. याचा रंग काळपट मातकट असतो, लांब काळसर शेपूट असते आणि मिश्रहारी प्राणी आहे. Saleksa हा प्राणी लहान कीडे, पाल, लहान साप, उंदीर, खेकडे तसेच काही वनस्पतीचे फळे खात असतो. तसेच नर आणि मादी हे एकएकटे राहत असून विनीच्या हंगामामध्ये एकत्र येऊन साधारणतः दोन महिन्याच्या गर्भधारणेनंतर मादी उदमांजर जवळपास दोन ते पाच पिल्लांना जन्म देते. ती पिल्ले मोठे होईपर्यंत मादी उदमांजरा सोबत राहते. सामान्यतः हा प्राणी लवकर दिसत नाही. कारण हा निशाचर आहे.
 
हा प्राणी निशाचर असला तरी स्थानिक शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालयात आज, 14 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास तो आपल्या 4 पिल्लांसह एका ओट्याखाली आढळून आला. Saleksa सालेकसामध्ये या प्राण्याची प्रथमच नोंद झाली आहे, अशी माहिती प्राणीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. संतोष पुरी यांनी दिली आहे. दरम्यान वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी रेक्स्यू करुन उदमांजर व तिच्या तीन पिल्लांना पकडून गावाशेजारील जंगलात सोडले. तर एक पिल्लू पळून गेले.
Powered By Sangraha 9.0