तभा वृत्तसेवा
पुसद,
Ranbhaji येथील जुन्या पंचायत समितीच्या इमारतीत रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.तालुकास्तर रानभाजी महोत्सव 2023 मध्ये विविध प्रजातीच्या रानभाज्याचे स्टॉल लावण्यात आले होते. महोत्सवात उद्घाटक व प्रमुख उपस्थितीमध्ये सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी इंद्रनील नाईक, उपविभागीय कृषी अधिकारी समाधान धुळधुळे, तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे यांची उपस्थिती होती.कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत तालुकास्तर रानभाजी महोत्सव 2023 चे तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत प्रदर्शन भरवण्यात आले होते.

येथील विक्री व प्रदर्शनात तरोटा, कुरडू, चुंच्या, सुरणकंद, माता चाळ, गुळवेल, राणपडवळ, रानकरवंद, पांढरी वसू, पिंपळपान, रानशेपू, शेवंगा, पाथरी, पांढरी गुंज, बिब्याचा फुलोरा, तांदूळग्याची अशा रान भाज्याचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते.Ranbhaji महोत्सवात तालुक्यातील पांडुरंग कुरकुटे, गणेश भटकळ, शिवाजी गुंजकर, सचिन चव्हाण, जीवन वानखेडे, देविदास कांबळे, किशोर गोदमले, वामन राठोड, सचिन राठोड, दिलीप ढगे, हरी बोडके, पंडित शिकारे, विनोद पांडे, शेख हुसेन शेख, गजानन शिंदे, हनुमान मुकाडे, विश्वनाथ मुखरे, कृष्णा चव्हाण या 19 शेतकर्यांनी सहभाग नोंदविला होता.रानभाजी महोत्सवाची नियोजन सहायक तंत्रज्ञान विभागाचे व्यवस्थापक मोरे यांनी केले होते. प्रदर्शनासाठी मंडळ कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, कृषीमित्र यांनी परिश्रम घेतले.