तभा वृत्तसेवा
कुर्हा,
सोयाबीन soybean crop हे खरीप हंगामामधील मुख्य पीक असून, या वर्षी सोयाबीनची लागवड जास्त प्रमाणात करण्यात आली आहे. मात्र, या सोयाबीन पिकावर सध्या ‘पिवळा मोझॅक’ हा रोग सर्वदूर पसरत आहे. यामुळे शेतकर्यांवर पुन्हा एकदा संकट कोसळले आहे.
या अनुषंगाने कृषी विभागाकडून सुद्धा जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. हा soybean crop गपिवळा मोझॅक’ रोग सोयाबीन पिकांवर फुले लागल्यानंतर दिसून येतो. त्यामुळे पिकांचे 30 टक्के नुकसान होते व उत्पन्नात मोठी घट येते. तसेच हा रोग उडीद, मूग पिकांवर सुद्धा काही प्रमाणात दिसत आहे. उशिरा येणारे वाण किंवा कोवळी पाने असलेल्या वाणात देखील हा रोग मोठ्या प्रमाणात दिसत आहे. दरवर्षी तेच ते पीक एकाच शेतात लागवड करणे, योग्य वाणांची निवड न करणे, बीज प्रक्रिया न करणे, आंतरमशागत व रस शोषण किडींच्या एकात्मिक व्यवस्थापनाचा अभाव, या सर्व कारणांमुळे सोयाबीन पिकांवर पिवळा मोझॅक हा रोग पसरतो. शेतात अशी झाडे दिसताच त्वरित उपटून नष्ट करावेत आणि मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करावा, असे जैविक शेती मित्र निखिल तेटू यांचे म्हणणे आहे.
शेतात soybean crop सोयाबीनचे रोगग्रस्त पिवळे झाड दिसून आल्यास एकरी 20-25 पिवळे चिकट सापळे शेतात लाकडी काठीवर बांधावेत आणि पक्षी थांबे तयार करावेत. त्यासाठी आंतरप्रवाही कीटकनाशक फवारणी करावी किंवा निम अर्क किंवा निम ऑईलची फवारणी करावी. फवारणी सकाळी 11 वाजेपर्यंतच करावी. त्यामुळे किडी पूर्णपणे नियंत्रित होतात. रिझल्ट लवकर मिळतो. उन्हात फवारणी करू नये. रासायनिक किटकनाशक फवारणी केल्याने पांढर्या माशीचा प्रादुर्भाव जलद पटीने वाढतो. त्यामुळे जैविक पद्धतीने फवारणीचे नियोजन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.