blackspot मागच्या वर्षाच्या तुलनेत अपघातात मृत्युचे प्रमाण कमी असले तरी अलिकडे अपघात वाढले आहे. काल तीन अपघाती मृत्यू झाले. अपघातावर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी युध्दपातळीवर आढावा घेवून परत ब्लॅक स्पॉट शोधण्याची मोहीम हाती घेण्यात येईल. यामाध्यातून अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रसार माध्यमांना दिली.
विकास कामे तर सुरूच राहतील. विकास कामांमुळे वाहतुकीस कधी कधी अडथळा निर्माण होता. मात्र, विकास कामांच्या अडथळ्यामुळेच अपघात घडतात असे म्हणने संयुक्तीक नाही. रस्त्यावर विकास कामे सुरू असताना रहदारीच्या आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक ती काळजी कंत्राटदाराने नक्कीच घ्यावी.blackspot कधी अपघात घडल्यास, वर्क ऑर्डर प्रमाणे काम होत नसल्याचे दिसून आल्यावर नक्कीच त्यांच्यावर कारवाई होते.वाहतूक पोलिस कर्मचाèयांना ई चालान डिव्हाईस देण्यात आले आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून चालान दिले जाते. कधी कधी पोलिस कर्मचाèयाकडे ई चालान डिव्हाईस नसेल तर तो खाजगी मोबाईलने फोटो काढून पाठवू शकतो. त्याची सत्यता पळताळल्यानंतर चालान दिली जाते. असेही पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.
वाहतूक पोलिस गणवेशात असने आवश्यक
वाहतूक पोलिस कर्तव्यावर असताना नेमप्लेट, टोपीसह संपूर्ण गणवेशात चौकात उभे राहून कर्तव्य बजावण्याचे निर्देश आधीच दिले आहेत. शक्यतो स्कार्पचा वापर टाळून मास्कचा उपयोग करावा. विपरीत परिस्थितीत कर्मचारी स्कार्पचा वापर करतात. स्कार्पचा उपयोग ओळख लपविण्यासाठी नव्हे तर प्रदूषणापासून वाचण्यासाठी केला जातो, असे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.