चारचाकी वाहनातील बॅटरी चोर जेरबंद

18 Aug 2023 19:57:45
तभा वृत्तसेवा
गोंदिया, 
Four wheeler battery चारचाकी वाहनांच्या बॅटर्‍या चोरी करणार्‍या आरोपीच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. भूषण विदेश साखरे (23) रा. सावित्रीबाई फुले वार्ड, गोंदिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शहरातील कुंभारेनगर येथील फिर्यादी अजय महेन्द्र गजभिये यांनी त्यांच्या गोंदिया येथील वॉटर प्लान्टच्या परिसरात स्वतःच्या मालकीच्या दोन टाटा एस चार चाकी वाहन उभे करुन ठेवले होते. दरम्यान सकाळी ते प्लांटमध्ये येवून वाहनाजवळ गेले असता दोन्ही वाहनांच्या बॅटर्‍या चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
 
 
Four wheeler battery
 
या प्रकरणी शहर पोलिस ठाणे येथे अज्ञात चोराविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस अंमलदार यांना गोपनिय माहितीच्या आधारे संशयीत भूषण साखरे याला ताब्यात घेत त्याची विचारना केली. Four wheeler battery मात्र त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्याच्या सांगण्यात तफावत दिसून आल्याने पोलिसानी त्याा खाकीचा धाक दाखवताच त्याने बॅटरी चोरी केल्याचे कबुल केले. त्याच्या ताब्यातून 10 हजार रुपये किमतीच्या चोरीतील दोन क्साईट कंपनीच्या बॅटर्‍या हस्तगत करण्यात आल्या. पढील तपास तपास महिला पोलिस हवालदार रिना चव्हाण करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0