वृद्धाश्रम काळाची गरज; आभासी चर्चेचा सूर

18 Aug 2023 19:00:51
नागपूर,
 
old age home ‘आनंदसाठी जन्म आपुला’ या व्हॉट्सअ‍ॅप समूहावर ‘वृद्धाश्रम काळाची गरज’ या विषयावर 13 ऑगस्टला दुपारी मासिक चर्चा रंगली. संकल्पना होती निर्मला गांधी यांची. old age home सर्वांनी आपापल्या दृष्टिकोनातून वेगवेगळी मते मांडली. तरी पण एक सूर मात्र कायम होता की, ‘वृद्धाश्रम ही काळाची गरज आहेच.’ कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या प्रसिद्ध लेखिका विजया ब्राह्मणकर तर प्रमुख पाहुण्या होत्या सरोज अंदनकर ! old age home श्रीगणेश आणि श्रीशारदा देवी यांना पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलन झाले. डॉ. अर्चना अलोणी यांच्या सुरेल स्वरात शारदास्तवन झाले. वर्षा देशपांडे यांनी अध्यक्ष आणि पाहुण्यांचा थोडक्यात परिचय करून दिला. old age home
 
 
old age home
 
विजया ब्राह्मणकर म्हणाल्या की, वृद्धाश्रम ही काळाची गरज आहे; पण हे लांछनास्पद आहे. त्याला सामाजिक परिस्थिती कारणीभूत आहे. कधी कधी नकोशी असलेली मंडळी वृद्धाश्रमात जातात किंवा त्यांना आणून सोडतात. मात्र वृद्धांच्या श्वासात घरचे लोक अडकलेले असतात. वृद्धाश्रमात चक्कर मारली की वृद्धांचे दुःख ऐकून जीव गलबलतो. old age home प्रमुख पाहुण्या सरोज अंदनकर म्हणाल्या, वृद्धाश्रम काळाची गरज आहे. मुलांची गरज संपली की त्यांना आई वडील नकोसे होतात. मग वृद्धाश्रम दिसतो. वृद्धाश्रमात आनंदात राहावे आणि त्याच स्थितीत दिवस घालवावे. वृद्धाश्रम ही त्यांना आधाराची काठी बनते. कार्यक्रमाचे संयोजक मो. बा. देशपांडे म्हणाले, पूर्वी विभक्त कुटुंब असले तरी लहान मुलांना बघण्यासाठी वृद्धांची घरामध्ये गरज भासत असे. old age home परंतु आता पाळणाघर, प्री नर्सरी यामुळे वृद्धांची घरातली गरज संपत आली. वृद्धांना वृद्धाश्रमात पाठवतात. घरी एकटे एका खोलीत राहणे, या पेक्षा पर्यायी म्हणून वृद्धाश्रमाचा वृद्धांनी स्वीकार करावा आणि तेथे आनंदात राहावे.
 
 
संयोजिका वर्षा विजय देशपांडे म्हणाल्या, कोणत्याही वृद्धाला वृद्धाश्रमात टाकले हे ऐकले की जीव तुटतो. old age home पण घरी सुद्धा ते एकटे पडतात. अशावेळी कमीत कमी पंधरा दिवसातून एकदा तरी वृद्धांना घरच्या लोकांनी घरी आणावे. त्यांच्या आवडीप्रमाणे खाणे करावे. पिकनिक किंवा मंदिरात न्यावे आणि पंधरा दिवसातून एक दिवस त्यांच्यासोबत आनंदात दिवस घालवावा. old age home डॉ. अर्चना अलोणी, डॉ.वसुधा पांडे, डॉ. विश्वेश्वर सावदेकर, विद्या करपटे, अनुराधा देशमुख, विद्या गोतमारे, नीता जोग, माया जयस्वाल, निर्मला गांधी, स्मिता खानजोडे, नितीन जोशी, अरुंधती वझलवार इत्यादी सदस्यांनी सकस चर्चा केली. आभार मो.बा. देशपांडे यांनी मानले. अन्वेषा वैद्यच्या गोड स्वरातील शांती मंत्राने कार्यक्रमाची समाप्ती झाली.
 
सौजन्य : वर्षा विजय देशपांडे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0