पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांना प्रदान

19 Aug 2023 20:40:14
- टाटा म्हणजेच ट्रस्ट, विश्वास : मुख्यमंत्री शिंदे
- देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची उपस्थिती

मुंबई, 
उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पहिला Udyog Ratna Award Ratan Tata ‘उद्योगरत्न’ पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. टाटा म्हणजे ट्रस्ट, टाटा म्हणजे विश्वास, अशी जगभर ‘याती असलेल्या रतन टाटा यांना हा पुरस्कार देण्यात आल्याने पुरस्काराचा सन्मान वाढला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
 
 
Ratan Tata frt
 
टाटा यांना त्यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी हा Udyog Ratna Award Ratan Tata पुरस्कार प्रदान केला. 15 लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्रिद्वय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित होते. पुरस्कार प्रदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मिठापासून ते वाहने, विमानांपर्यंत टाटा समूहाच्या उद्योगातून निर्मिती होते. टाटा समूहाने देशासह जगभरात भरीव योगदान दिले आहे. राज्य शासनातर्फे उद्योग क्षेत्रातील योग्य व्यक्तीला हा पुरस्कार देताना मला आनंद होत आहे.
 
 
महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या नामवंत उद्योजकांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या धर्तीवर या वर्षीपासून राज्य शासनाने ‘महाराष्ट्र उद्योग पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा, उद्योगमित्र पुरस्कार सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांना तर, Udyog Ratna Award Ratan Tata उद्योगिनी पुरस्कार किर्लोस्कर समूहाच्या गौरी किर्लोस्कर, उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार विलास शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. हे पुरस्कार रविवारी समारंभपूर्वक राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.
Powered By Sangraha 9.0