तभा वृत्तसेवा
नागपूर,
Bajrang Dal Nagpur हरयाणाच्या मेवात जिल्ह्यातील नूंह येथे बृजमंडल भगवा यात्रेच्या काळात दोन समूदायांमध्ये वाद होउन दगडफेक करण्यात आली. यात अनेकजण जखमी तर पाच जणांचा मृत्यू झाला असून वाहनांची देखील जाळपोळ करण्यात आली. याच घटनेचा निषेध विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने संपूर्ण देशात करण्यात आला. या अंतर्गत नागपूर बजरंग दल व विहिंपतर्फे व्हेरायटी चौक येथे बुधवारी निदर्शने करण्यात आली. Bajrang Dal Nagpur गुरुग्राम येथून सुरु झालेली बृजमंडल भगवा यात्रा ही नूंह येथील शिव मंदिरासमोरुन जात होती. विहिंपतर्फे आयोजित या यात्रेवर एका जमावाकडून अचानक दगडफेक सुरु झाली.
यादरम्यान यात्रेत सहभागी कार्यकर्ते मागे हटण्याच्या प्रयत्नात असतांना मागून देखील हल्ला करण्यात आला. दगडफेकीसह पेट्रोल बाँब देखील फेकण्यात आले. या परिसरात असणा-या दुकानांना आगी लागवण्यात आल्या. वाहनांची तोडफोड व जाळपोळ करण्यात आली. विशेष म्हणजे बंदोबस्तात असणारे पोलीस देखील यात जखमी झाले. या घटनेचा नागपुरातील बजरंग दल व विहिंपने कडाडून निषेध केला आहे. विहिंप, मुंबईचे क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांच्या मार्गदर्शनात आंदोलन देखील करण्यात आले. यावेळी जिहादी व पाकिस्तानचा प्रतिकात्मक झेंडा जाळत बजरंगी कार्यकर्त्यांनी निषेध दर्शविला.
देशात विविध राज्यात हिंदूवर होणारे अत्याचार त्वरीत थांबवावे यासाठी संबंधीत शासनाने पावलं उचलावी. हिंदूवर होणारे अत्याचार कमी न झाल्याचे त्याचे परिणाम अतिशय वाईट होतील असा ईशारा यावेळी देण्यात आला. Bajrang Dal Nagpur तसेच शोभायात्रेवर होणारा हल्ला हा पूर्वनियोजित असून त्यासाठी लागणारे शस्त्रसाठा त्यांनी आधीच जमवून ठेवला होता. त्या ठिकाणाहून हा हल्ला झाला ती घरे जमिनदोस्त करा, तसेच आरोपींवर कठोर कारवाई करा अशी मागणी यावेळी गोqवद शेंडे यांनी केली. Bajrang Dal Nagpur याप्रसंगी आंदोलनाचे नेतृत्व नागपूर महानगर मंत्री अमोल ठाकरे यांनी केले. आंदोलनात बजरंग दल संयोजक लखन कुरील, प्रचार-प्रसार प्रांत प्रमुख निरंज रिसालदार, विहिंप महानगर सहमंत्री प्रशांत मिश्रा, बजरंग दल सहसंयोजक ऋषभ अरखेल, Bajrang Dal Nagpur विहिंप विदर्भाचे धर्म प्रसार प्रमुख राजकुमार शर्मा आदी उपस्थित होते.