डॉ. प्रसाद बनसोड आरोग्य विज्ञान विद्यापीठ सिनेट सदस्यपदी

20 Aug 2023 21:32:31
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
येथील आयुर्वेदाचार्य डॉ. प्रसाद बनसोड Dr. Prasad Bansod यांची महाराष्ट्र सरकारच्या वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून नेमणूक केली आहे. अमरावती महसूल विभागातून ही निवड 5 वर्षांसाठी असेल. डॉ. प्रसाद बनसोड हे सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असतात. विशेषतः तळागाळातील गरजूंपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्यात तत्पर असतात. ग्रामीण भागात जनमानसात आयुर्वेद पोहोचला पाहिजे याच तळमळीने त्यांचे हे कार्य चालत असते.
 
Dr. Prasad Bansod
Powered By Sangraha 9.0