सैनिकांसाठी प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये राखी अर्पण सोहळा

    दिनांक :21-Aug-2023
Total Views |
नागपूर,
Prahar Military School सी.पी.अँड बेरार एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये राखी तयार करून सैन्यांना पाठविणे हा उपक्रम गेल्या कित्येक वर्षापासून घेतला जातो. सैनिक हा देशाचा कणा आहे. ज्या देशाची सैनिक मिलिटरी व्यवस्था समृद्ध असते तो देश अग्रेसर असतो, हाच उद्देश समोर ठेवून प्रहाराने मिलिटरी शिक्षणात पुढाकार घेतला आहे. सैनिक सीमेवर रात्रंदिवस कठीण परिस्थितीचा सामना करतो. त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे व सर्व भारतीय बांधवांच्या प्रेमाचा दिलासा देणे, या उद्देशाने प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये राखी अर्पण समारंभ घेण्यात येतो. यावर्षी 19 ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रहारच्या शिस्तबद्ध बँड पथकाने प्रमुख अतिथींचे स्वागत केले.
 
 
prahar school
 
भारत माता पूजन व प्रमुख अतिथींच्या सत्कारानंतर कार्यक्रम सुरू झाला. लष्करी शिस्तीत अमर जवानला पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली अर्पण करण्यात आली. सैनिक सीमेवरील कष्ट, संकटे किती हिमतीने, एकजुटीने व अभिमानाने झेलतात. हे प्रहार च्या विद्यार्थ्यांनी एका देशभक्तीपर गायनाद्वारे प्रस्तुत करून प्रेक्षकांना खिळवून ठेवले. Prahar Military School याप्रसंगी सी.पी.अँड बेरार एज्युकेशन सोसायटी अंतर्गत येणाऱ्या आणि इतरही विविध शाळांनी तयार केलेल्या राख्या मेजर जनरल ए. एस. देव, अध्यक्ष अनिल महाजन, सचिव यांनी लेफ्टनंट कर्नल एस मणिकंदन ए.पी.एस कामठी, यांच्या स्वाधीन केल्या, जेणेकरून रक्षाबंधनापर्यंत त्या राख्या सीमेवरील सैन्यात पोहोचतील व त्यांच्या खडतर कार्याविषयी अभिमान, कृतज्ञता व सामाजिक बांधिलकीची जाणीव त्यांच्यापर्यंत पोहोचेल.
  
प्रहारच्या राखी अर्पण कार्यक्रमात प्रमुख अतिथींनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रहारच्या या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा केली. प्रहारची शिस्त, कार्यक्रमाचे व्यवस्थापन कौशल्य, विद्यार्थ्यांचा उत्साह आणि देशप्रेम जबाबदारीची जाणीव यांनी ते प्रभावित झाले. यावेळी शाळेच्या प्राचार्य वंदना कुलकर्णी उपस्थित होत्या. Prahar Military School सी.पीअँड बेरारच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे प्रमुख, प्राचार्य, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रहारच्या सर्व सभासदांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला. या कार्यक्रमाचे संचालन व आभार शाळेच्या शिक्षिका मंजूषा वैरागडे यांनी मानले. कार्यक्रमात नागपुरातील सगळ्या शाळांनी एकूण सोळा हजार राख्या पाठवून सक्रिय सहभाग घेतला व नागपुरातील 22 विविध शाळांनी राखी अर्पण कार्यक्रमात उपस्थिती नोंदवली होती.
 
सौजन्य : देवराव प्रधान, संपर्क मित्र