नागपूर विद्यापीठात २४ व २६ ऑगस्टला टीसीएसचा रोजगार मेळावा

-विद्यापीठ रोजगार व प्रशिक्षण विभागाचे आयोजन
जनसंपर्क विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर

    दिनांक :21-Aug-2023
Total Views |
नागपूर,
Nagpur University : टीसीएस मिहानच्या वतीने गुरुवार, २४ ऑगस्ट व शनिवार २६ ऑगस्ट २०२३ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रोजगार व प्रशिक्षण विभागाच्या वतीने हे रोजगार मिळावे आयोजित केले जात आहे. (Nagpur University) टीसीएस मिहान नागपूर येथे गुरुवार, २४ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता तर भंडारा येथील जे. एम. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शनिवार, २६ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता रोजगार मेळावा होणार आहे.

Nagpur University
 
टीसीएस मिहानकडून बीपीएस ग्रॅज्युएट पदाकरिता हा (Nagpur University) रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरिता २०२१, २०२२ व २०२३ मध्ये बीए, बीकॉम, बीएएफ, बीबीआय, बीबीए, बीबीएम, बीएमएस, बीएसस्सी (सीएस/आयटी वगळता) आदी पदवीचे शिक्षण आवश्यक आहे. नुकतेच पदवीचे शिक्षण झालेले तसेच ०-३ महिन्यांचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. नागपूर हे नोकरीचे ठिकाण राहणार आहे.
 
 
रोजगार मेळाव्यात (Nagpur University) सहभागी होण्याकरिता विद्यापीठाच्या समाज माध्यमांवर देण्यात आलेल्या लिंकवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. उच्च अहर्ता प्राप्त उमेदवारांचा या भरतीमध्ये विचार केल्या जाणार नाही. संबंधित वर्षांमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी रोजगार मिळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे व रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन यांनी केले आहे.