श्री सोमनाथ महाराज मंदीरात भाविकांची मांदियाळी

    दिनांक :21-Aug-2023
Total Views |
बुलढाणा,
Sri Somnath Maharaj temple श्रावण मासातील पहिला श्रावण सोमवार 21 ऑगस्ट रोजी असल्याने चिखली तालुक्यातील डोंगरशेवली येथील श्रीक्षेत्र सोमनाथ महाराज मंदीरात भोलेनाथाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविक भक्तांची मांदियाळी दिसून आली. डोंगर शेवलीसह परिसरातील भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेले श्री सोमनाथ महाराज मंदीर हे जागृत देवस्थान आहे.
 
 
Sri Somnath Maharaj temple
 
भाविकांच्या श्रध्देला पावणाऱ्या भोलेनाथांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मंदीरावर नेहमीच गर्दी असते. अन् श्रावण महिना म्हटला तर, भोलेनाथांच्या दर्शनासाठी पूर्ण जिल्हयातील भाविक भक्त मोठया संखेने येत असतात. Sri Somnath Maharaj temple मंदीर व्यवस्थापनाकडून येणाऱ्या भाविकांची दर्शनासाठी गैरसोय होवू नये म्हणून विशेष काळजी घेतल्या जाते. तसेच भाविकांसाठी चहा, फराळाचे वाटप मंदीर विश्वस्त मंडळी व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत असते. दरम्यान श्रावण महिन्याचा पहिलाच सोमवार असल्याने आज भाविकांची मोठी गर्दी या मंदीरावर दिसून आली.