शेतकर्‍यांच्या हिताची जपणूक हेच संस्थेचे धोरण : नागीलवार

21 Aug 2023 18:51:51
कुरखेडा, 
organization policy संस्था ही शेतकर्‍यांची आहे. त्यामुळे संस्थेला नफा-तोटा हा विषय गौण आहे. खुल्या बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करीत रासायनिक खते, बियाणेकरीता शेतकर्‍यांची लूट होऊ नये, याकरीता संस्था शासनाने ठरवून दिलेल्या माफक दरातच खते, बियाणे शेतकर्‍यांना उपलब्ध करून देत असते. शेतकर्‍यांच्या हिताची जपणूक करणे हेच संस्थेचे धोरण असल्याचे प्रतिपादन कुरखेडा येथील खरेदी-विक्री सहकारी संस्थेचे अध्यक्ष व्यंकटी नागीलवार यांनी केले.
 
 
organization policy
 
येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेतील सभागृहात 20 आगस्ट रोजी खरेदी-विक्री सहकारी संस्थेची वार्षिक आमसभा घेण्यात आली, यावेळी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. organization policy याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक खेमनाथ पाटील डोंगरवार, संस्थेचे उपाध्यक्ष हरिश्‍चंद्र डोंगरवार, संचालक आनंदराव जांभूळकर, उध्दव गहाणे, वसंतराव मेश्राम, आनंदराव आकरे, काशीनाथ दोनाडकर, जयवंत कापकर, जिवन मेश्राम, अ‍ॅड. उमेश वालदे तसेच संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
यावेळी संस्थेकडून सभासदांना भाग भांडवल प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. संस्थेच्या जमा-खर्चाचा आढावा व सभेचे संचालन संस्था सचिव सुधाकर वैरागडे यांनी केले तर आभारप्रदर्शन उपाध्यक्ष हरिश्‍चंद्र डोंगरवार यांनी केले. organization policy यशस्वीतेकरीता लिपीक रहेमतूल्ला पठाण, विवेक लाडे, प्रशांत ठलाल, सतिष बाळबुद्धे, दामोधर जनबंधू यांनी सहकार्य केले.
Powered By Sangraha 9.0