आगार व्यवस्थापक संतोष वानेरे, वाहक महादेव सावरकर यांना लाच घेतांना अटक

    दिनांक :22-Aug-2023
Total Views |
बुलढाणा, 
पंढरपूर यात्रेदरम्यान बस Santosh Vanere मध्ये स्टोव्ह पेटवून स्वयंपाक केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओचा अहवाल वरिष्ठांकडे न पाठविण्या करीता आगार व्यवस्थापक संतोष महादेव वानरे यांनी पहिल्यांदा चाळीस हजार रूपये लाचेची मागणी करून त्यानंतर वाहक महादेव सावरकर यांच्या मार्फत 35 हजार रूपये लाच मागितली 28 हजार रूपये यापूर्वी स्विकारले पुन्हा 7 हजार रूपयांची मागणी केली. दरम्यान महादेव सावरकर यानी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडून 7 हजार रूपये स्वीकारतांना बुलढाणा खामगाव रोडवरील संत तुकाराम पतसंस्थे समोर दि. 22 ऑगस्ट रोजी रंगेहात पकडले.
 
Santosh Vanere
 
याप्रकरणात आगार व्यवस्थापक यांनी प्रोत्साहन दिल्याचे स्पष्ट झाले आहे. Santosh Vanere याप्रकरणात आगार व्यवस्थापक संतोष वानरे वाहक महादेव सावरकर राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा यांच्या विरूद्ध बुलढाणा प पोलिस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई पथकात लाच लुचपत विभागाच्या पोलिस उपअधिक्षक श्रीमती शितल गोगरे, पोलिस निरीक्षक सचिन इंगळे, पोलिस हेकॉ. मोम्हद रिझवान, राजु शिरसागर, प्रविण बहीरागे, विनोद लोखंडे, जगदीश पवार रविंद्र दळवी, सुनील राऊत, गजानन गाल्डे, स्वाती वाणी, चालक पोलिस कॉन्स्टेबल अशरद शेख यांनी सहभाग घेतला.