राष्ट्रपतींकडून इस्रोच्या चमूचे अभिनंदन

24 Aug 2023 20:04:05
- रोव्हर प्रज्ञान यशस्वीपणे स्थापित
 
नवी दिल्ली, 
विक्रम लॅण्डरच्या आतून रोव्हर प्रज्ञान यशस्वीपणे स्थापित केल्याबद्दल Congratulations ISRO team राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या चमूचे अभिनंदन केले आहे. चांद्रयान-3 हे आणखी एका टप्प्याचे यश दर्शवते असेही त्यांनी म्हटले आहे.
 
 
President Draupadi Murmu isro
 
त्यांच्या सोशल नेटवर्किंग साईट ‘एक्स’वर म्हटले आहे की, मी माझ्या देशबांधवांसह आणि शास्त्रज्ञांसह, अशा माहितीची आणि विश्लेषणाची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे ज्यामुळे चंद्राबद्दलचे आपले ज्ञान समृद्ध होईल. इस्रोच्या तिसर्‍या चांद्र मोहिमेचे लॅण्डर मॉड्यूल चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचल्याने भारताने बुधवारी इतिहास रचला. यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर पाय ठेवणारा भारत हा चौथा देश बनला आणि आपल्या पृथ्वीच्या एकमेव नैसर्गिक उपग्रहाच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश बनला. राष्ट्रपती म्हणाल्या, विक्रम लॅण्डरमधून रोव्हर ‘प्रज्ञान’ यशस्वीपणे स्थापित केल्याबद्दल मी पुन्हा एकदा Congratulations ISRO team  इस्रोच्या चमूचे आणि देशवासीयांचे अभिनंदन करते. ‘विक्रम’ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर काही तासांनी रोव्हर सोडणे हे चांद्रयान-3 च्या दुसर्‍या टप्प्याचे यश असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
Powered By Sangraha 9.0