इस्त्रोच्या शास्त्रज्ञानी केलेेले संशोधन विलास धोंडगे

मे.ए.सो.च्या वतीने चांद्रयान 3 च्या यशस्वीतेचा जल्लोष

    दिनांक :24-Aug-2023
Total Views |
मेहकर
Istro चांद्रयान मोहिमेतून चंद्र व त्याच्या कलेचा अभ्यास करणे शक्य होणार आहे.भुगोल व विज्ञान विषयाच्या अध्ययनासाठी ही मोहिम महत्वपूर्ण आहे.इस्त्रोच्या शास्त्रज्ञानी केलेले कार्य कौतुकास्पद असून आपण त्याची भारतीय नागरिक म्हणून सदैव जाणीव ठेवली पाहिजे.असे विज्ञान शिक्षक विलास धोंडगे यांनी सांगितलेचांद्रयान 3 च्या यशस्वीतेचा स्थानिक मे.ए.सो.च्या जल्लोष करण्यात आला.यावेळी इस्त्रो शास्त्रज्ञांचे अभिनंदन करण्यात आले. चांद्रयान 3 च्या यशस्वितेने भारताची मान उंचावली आहे.यासाठी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी अतोनात मेहनत घेतली.त्यांचे अभिनंदन करणारा कार्यक्रम मे.ए.सो.हायस्कूल च्या प्रांगणात 24 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता.
 

ISro 
 
संस्थेचे अध्यक्ष रविंद्र अवस्थी ,सचिव हर्षल सोमण व सर्व संचालक मंडळ व मे.ए.सो.हायस्कूल यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यातआले होते .Istro कार्यक्रमाची सुरवात सरस्वती,भारतमाता व डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमापुजनाने झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मे.ए.सो.हायस्कूल चे प्राचार्य हेमंत कविमंडन हे होते तर याशिवाय व्यासपीठावर पर्यवेक्षिका संध्या कोरान्ने, यांची उपस्थिती होती. चंद्रयान मोहिम त्याचे आगामी फायदे व भविष्यातील मोहिमा यांची इंतभूत माहिती विलास धोंडगे यांनी यावेळी सांगितली .या कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन शिवप्रसाद थुट्टे यांनी केले